एक्स्प्लोर

राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल

Maharashtra Local Body Election: मतदार यादीतील अडचणी दुरुस्त करायला हव्या होत्या, मात्र दुबार नावे काढण्याबाबत आधी अधिकार असल्याचे सांगणारा आयोग आता अधिकार नसल्याचे म्हणत असल्याचा आरोप त्यांनी केला. 

Maharashtra Local Body Election: राज्यात 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर मतदार यादीवरून राज्य निवडणूक आयोगावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी हल्ला चढवला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची मतदार यादी जशीच्या तशी स्वीकारणे हे निकोप लोकशाहीचे लक्षण नसल्याचे मत थोरात यांनी व्यक्त केले. मतदार यादीतील अडचणी आधी दुरुस्त करायला हव्या होत्या, मात्र दुबार नावे काढण्याबाबत आधी अधिकार असल्याचे सांगणारा आयोग आता अचानक अधिकार नसल्याचे म्हणत असल्याचा आरोप त्यांनी केला. 

कुठल्यातरी ‘रिमोट कंट्रोल’खाली निवडणूक प्रक्रिया

10 टक्के गोंधळ जरी असला तरी त्यामुळे किती मतदार वाढले याचा सवाल उपस्थित करत, डिजिटल युगात दुबार नावे स्पष्टपणे दिसत असतानाही त्यात बदल न होणे म्हणजे कुठल्यातरी ‘रिमोट कंट्रोल’खाली निवडणूक प्रक्रिया चालवली जात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. निवडणूक आयोग जे करत आहे ते निवडणुकीचा पोरखेळ असल्याची टीका करत, ब्राझीलच्या मॉडेलचा उल्लेख वारंवार केला जातो, मग त्याची अंमलबजावणी किती वेळा केवळ ‘स्टार’ केलं जाणार, असा सवालही थोरात यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, राज्यातील मुदत संपलेल्या 27 महानगरपालिका तसेच नव्याने निर्माण झालेल्या जालना आणि इचलकरंजी महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने आज घोषणा केली. निवडणूक रणधुमाळी 23 डिसेंबरपासून सुरू होणार असून 15 जानेवारी रोजी मतदान आणि 16 जानेवारी रोजी पुढील प्रक्रिया पार पडणार आहे.

माधानकारक तोडगा काढण्यात आल्याचा दावा

दरम्यान, महापालिका निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 रोजीची मतदार यादी वापरण्यात येणार असून ही यादी भारतीय निवडणूक आयोगाची (Election Commission of India) असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. मतदार यादीसंदर्भात काही तक्रारी व आक्षेप प्राप्त झाले होते. त्या सर्व आक्षेपांवर स्पष्टीकरण देण्यात आले असून त्यावर समाधानकारक तोडगा काढण्यात आल्याचे राज्य निवडणूक आयोगाने सांगितले. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी आणि प्रशासकीय निष्पक्षतेसाठी, ज्या अधिकाऱ्यांनी एका ठिकाणी 5 वर्षे पूर्ण केली आहेत किंवा काही प्रकरणांमध्ये 3 वर्षे पूर्ण केली आहेत, त्यांची बदली करण्याचे धोरण राबवण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. हे धोरण निवडणूक काळात प्रभावीपणे अंमलात आणले जाणार आहे.महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर करण्यापूर्वीच राज्य निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांची बैठक घेतली होती. या बैठकीत मतदार याद्यांमधील संभाव्य घोळ, दुबार मतदार, तसेच तांत्रिक सुविधांबाबत चर्चा झाली. अनेक राजकीय पक्षांनी मतदार याद्यांतील त्रुटींविषयी चिंता व्यक्त केली होती, मात्र निवडणूक आयोगाने त्यांचे समाधान केल्याचे सांगण्यात आले.

मुंबईत 7 टक्के मतदार दुबार आढळले

दुबार मतदारांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने (BMC) एक विशेष तांत्रिक टूल विकसित केले आहे. या टूलच्या माध्यमातून दुबार मतदारांची अचूक ओळख करण्यात येत असून राजकीय पक्षांनी या टूलबद्दल पूर्ण समाधान व्यक्त केले आहे.  मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीत सुमारे 7 टक्के मतदार दुबार आढळून आले असून, एकूणच दुबार मतदारांचे प्रमाण 5 ते 20 टक्क्यांपर्यंत असल्याची माहिती आयोगाने दिली आहे. दुबार मतदारांची सविस्तर माहिती संबंधित राजकीय पक्षांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. याच धर्तीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेनेही दुबार मतदार शोधण्यासाठी स्वतःचे टूल विकसित केले आहे. तसेच राजकीय पक्षांना ‘Voters Search Facility’ पोर्टलवर संपूर्ण माहिती दाखवण्यात आली असून ‘मताधिकार ॲप’चीही माहिती देण्यात आली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

India America Trade Deal: भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget