इकडे विमानाची वेळ झाली, तिकडे बायकोला स्टारबक्स कॉफीची तलफ आली, नवऱ्याने बायकोला सोडलं, पण फ्लाईट नाही सोडली!
Weird News: परदेशातील आपल्या मुलीला भेटायला जाण्यासाठी दाम्पत्य निघाले होते. विमानतळाच्या गेटवर पोहोचताच पत्नी म्हणाली, तिला स्टारबक्सची कॉफी हवी आहे आणि यापुढे जे झालं ते पाहाच...
Weird News: पुरुषांना महिलांची एक सवय (Habit) अजिबात आवडत नाही. आता तुम्ही विचार कराल, नेमकी कोणती सवय बरं? तर ही सवय आहे, उशिरा येण्याची. बऱ्याचदा असं होतं की, कुठे जायचं म्हटलं की महिला (Women) नेहमी उशीर करतात आणि पुरुषांना (Men) त्यांची वाट पाहत बसावं लागतं. याच कारणामुळे अनेकदा पुरुष महिलांवर चिडतात. असंच काहीसं पॅसिफिक नॉर्थवेस्टमध्ये (Pacific Northwest) राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत घडलं आहे.
नेमकं घडलं काय?
47 वर्षीय व्यक्तीला त्याच्या मुलीला भेटण्यासाठी दुसऱ्या देशात जायचं होतं, यासाठी त्याने त्याचं आणि त्याच्या पत्निचं विमानाचं तिकीट (Flight Ticket) काढलं होतं. दोघे एकत्रच फ्लाईट पकडण्यासाठी एअरपोर्टवर पोहोचले होते. पण एन्ट्री गेटवर पोहोचताच बायको म्हणाली की, तिला स्टारबक्सची कॉफी (Starbucks Coffee) हवी आहे.
यानंतर त्या व्यक्तीने बायकोला स्टारबक्सची कॉफी घेऊन येण्याची अनुमतीही दिली. जा, पण फ्लाईट टेक ऑफ होण्याआधी ये, असं त्याने बजावून सांगितलं. ती देखील हो येते म्हणत कॉफी घ्यायला एअरपोर्टवरील स्टारबक्समध्ये गेली.
स्टारबक्स कॉफीमुळे केला उशीर
आता या व्यक्तीने त्याच्या बायकोची बराच वेळ वाट पाहिली, पण ती काही वेळेत पोहोचली नाही. थोडाच वेळात विमानाच्या उड्डाणासाठी लास्ट कॉल झाला. यानंतरही त्या व्यक्तीने बायकोची वाट पाहिली, पण ती काही आली नाही. त्याने बऱ्याचदा बायकोला फोन करण्याचाही प्रयत्न केला, पण तिने फोनही उचलला नाही.
बायकोला सोडलं, पण फ्लाईट नाही सोडली
यानंतर मात्र एअरलाईन क्रूने व्यक्तीला सांगितलं की, एकतर तुम्ही बायकोची वाट पाहत एअरपोर्टवरच थांबा... किंवा एकटेच फ्लाईट पकडा. ज्यानंतर व्यक्तीने ठरवलं की, तो एकदाच फ्लाईट पकडणार. तिथे बायको स्टारबक्समध्ये कॉफी पित राहिली आणि तिच्या नवरा विमानात बसून आपल्या मुलीला भेटायला पुढे गेला. यानंतर त्या व्यक्तीने बायकोला फोन केला आणि म्हणाला, तू आता दुसरी फ्लाईट पकडून ये.
लोकांनी त्या व्यक्तीलाच दर्शवला पाठिंबा
आता हा प्रसंग ज्या व्यक्तीसोबत घडला त्याने म्हटलं की, हे काही माझ्यासोबत पहिल्यांदाच घडत नाही. याआधीही बऱ्याचदा माझ्या बायकोने असं केलं आहे, ज्यामुळे आमची फ्लाईट मिस झाली आहे.
या व्यक्तीने Reddit वर लोकांना प्रश्न विचारला की, त्याने त्याच्या बायकोसोबत जे केलं ते बरोबर आहे की चुकीचं? बायकोला एअरपोर्टवर सोडून फ्लाईट पकडण्याचा निर्णय बरोबर होता का? या प्रश्नावर उत्तरं देणाऱ्या सर्वांनी त्या व्यक्तीचा निर्णय अगदी बरोबर असल्याचं म्हटलं. बायकोला धडा शिकवण्यासाठी त्याची गरज होती, कारण याआधीही बऱ्याचदा तिने असं केलं होतं.
हेही वाचा: