Trending Video : आपापसातच भिडले 5-6 सिंह, कोणी मारली बाजी? चित्तथरारक झुंजीचा व्हिडीओ व्हायरल
Viral Video : सोशल मीडियावर पाच - सहा सिंहांमध्ये झालेल्या जबरदस्त झुंजीचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. तुम्ही हा व्हिडीओ पाहिला का?
Lion Fight Video : जंगलचा राजा सिंहाला माणसं काय तर अगदी जंगलातील प्राणीही घाबरतात. कोणीही त्याच्या पुढ्यात न जाणंच पसंत करतो. आजकाल सोशल मीडियावर पाळीव किंवा जंगली प्राण्यांचे व्हिडीओ अधिक पाहायला मिळतात. असे व्हिडीओ फार वेगाने व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये चक्क पाच - सहा सिंह एकमेकांसोबत झुंज करताना दिसत आहेत.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल एका व्हिडीओमध्ये सिंहच आपापसात लढत असल्याचं दिसत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पाच ते सहा सिंहांची झुंज पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर शहारा येईल. एका प्राणीसंग्रहालयातील हा सिंहांच्या झुंजीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये सिंहांची झुंज डब्ल्यूडब्ल्यूई मॅचप्रमाणे वाटत आहे.
View this post on Instagram
सिंहांच्या झुंजीचा व्हायरल झालेला हा व्हिडीओ एका प्राणीसंग्रहालयातील (Zoo Viral Video) आहे. व्हिडीओमध्ये तुम्हांला पाच ते सहा सिंहा आपापसात भांडताना दिसतील. त्यांच्यामागे जाळी दिसत आहे. जाळीच्या पलिकडून लोक सिंहांची झुंज पाहण्याची मजा घेत आहेत. अनेकदा लोकांना जंगल सफारी करताना प्राण्याची झुंज पाहायला मिळते. त्यामध्येही सिंहांची झुंज सहज पाहायला मिळत नाही. मात्र, या प्राणीसंग्रहालयात एक किंवा दोन नाही तर चक्क पाच ते सहा सिंह आपापसांत भिडताना पाहायला मिळाले.
व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की, आधी ही लढाई फक्त दोन सिंहांमध्ये सुरु झाली. पण त्यानंतर इतर सिंहानी या भांडणात उडी घेत एकमेकांवर हल्ला केला. ही सर्व घटना तिथे उपस्थित पर्यटकांनी त्यांच्या कॅमेऱ्यात चित्रीत केली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. इंस्टाग्रामवर (Instagram) lion.king_21 नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.