ऐकावं ते नवलंच! 'या' प्राण्याला 32 मेंदू, 300 दात आणि 10 डोळे; आयुर्वेदीक उपचारांसाठी वापर, हा प्राणी कोणता? जाणून घ्या...
Interesting Facts : आज आम्ही तुम्हाला अशाच एका प्राण्याबद्दल सांगणार आहोत, ज्याला 32 मेंदू, 10 डोळे आणि 300 दात आहेत.
Leech Interesting Facts : तुम्ही जगात अनेक प्रकारचे जीव पाहिले असतील. काही इतर सजीवांपेक्षा वेगळे असल्यामुळे खास असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका प्राण्याबद्दल सांगणार आहोत. या प्राण्याबद्दल विशेष म्हणजे याला 32 मेंदू, 10 डोळे आणि 300 दात आहेत.
एक नव्हे तर 32 मेंदू
माणूस असो वा प्राणी, प्रत्येकाला मेंदू असतो, पण या प्राण्याच्या शरीरात 1 नव्हे तर 32 मेंदू आढळतात. पण 32 मेंदू असूनही जळू मानवाच्या एका मेंदूची बरोबरी करु शकत नाही. जळू हा प्राणी तुम्हाला माहित असेल. याला रक्त शोषणारा जळू, जळवा किंवा लीच (Leech) असंही म्हटलं जातं. जळू या प्राण्याला 32 मेंदू असतात. इतकंच नाही तर जळूला 3 जबडे असतात आणि प्रत्येक जबड्याला 100 दात असतात. या दातांच्या मदतीने ती मानवी शरीरातून रक्त शोषते. आम्ही तुम्हाला सांगतो की जळू त्याच्या वजनापेक्षा 10 पट जास्त रक्त शोषू शकते.
32 मेंदू असण्याचं कारण काय?
जळूला 10 डोळे असतात. या डोळ्यांद्वारे जळू गडद आहे की प्रकाश हे ओळखते, तसेच वेग आणि आकार याचाही अंदाज जळूला डोळ्यांमार्फत येतो. जळूचे शरीर 32 तुकड्यांमध्ये विभागलेले असते, हे तुम्हाला जळूचं शरीर पाहिल्यावर कळेल. जळूला या प्रत्येक भागात एक स्वतंत्र मेंदू असतो. मूळात हे 32 मेंदू नसून एकच मेंदू आहे, जो 32 तुकड्यांमध्ये विभागलेला गेला आहे. 32 तुकड्यांमध्ये विभागलेलं असलं तरीही जळूचे शरीर जोडलेलं असतं. जळूच्या 32 भागांपैकी प्रत्येक भागाची स्वतःचं गॅंग्लिया (Ganglia) म्हणजे एक प्रकारचा मज्जातंतू (Nervous System) असतो, या द्वारे प्रत्येक भाग एकमेकांसोबत जोडलेला असतो.
कुठे आढळतात जळू?
जळू किंवा जळवा या ॲनेलिडा प्राणी संघातील हिरुडिनिया वर्गातील जीव आहेत. बहुतेक जळू गोड्या पाण्यात आढळतात, पण काही समुद्रातील माशांच्या किंवा इतर प्राण्यांच्या शरीरावर आढळणारे वळू परजीवी म्हणजेच दुसऱ्या जीवावर जगणारे असतात. तर काही जळू जमिनीवर दमट किंवा दलदलीच्या ठिकाणी राहतात.
लीच थेरपी
जळू म्हणजे जळवा (Leech) माणूस आणि जनावराचं रक्त शोषण्यासाठी ओळखला जातो. रक्त शोषणारा हा जळू आयुर्वेदाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. काही विशिष्ट प्रकारच्या वळूंचा विविध आजारांवरील उपचारासाटी वापर केला जातो, याला लीच थेरपी असं म्हणतात.
लीच थेरपी कोणत्या आजारांवर गुणकारी?
शरीरातील रक्ताभिसरण वाढवण्यासाठी आणि रक्ताच्या गुठळ्यांच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी लीच थेरपी प्रभावी मानली जाते. ते रक्ताभिसरण विकार आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांवर उपचार करण्यासाठी वापरले जाऊ शकतात यात आश्चर्य वाटू नये. जळूच्या लाळेपासून मिळणारी रसायने फार्मास्युटिकल औषधे बनवली गेली आहेत जी उपचार करू शकतात: उच्च रक्तदाब.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )