Wolf Man : हौसेला मोल नाही, लांडग्यासारखं दिसण्यासाठी खर्च केले लाखो रुपये
Man look Like Wolf : या व्यक्तीने सांगितले की, त्याला प्राण्यांची आवड आणि त्याच्याबद्दल खूप प्रेम आहे. त्याला बालपणापासूनच लांडग्यासारखं दिसण्याची इच्छा आहे.
Japanese Man Spent Rs. 18 lakh to look like Wolf : 'शौक बडी चीज हैं...', असा एक प्रसिद्ध डायलॉग आहे. एकेकाची हौस काही न्यारीच असते. काही लोकांचे छंद विचित्र असतात. काही लोकांचे छंद इतके महागडे असतात, की हे ऐकून एखाद्या सर्वसामान्य माणसाला धडकीच भरेल. असाच एक प्रकार जपानमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने केला आहे. आपल्या आवडत्या प्राण्याप्रमाणे दिसण्यासाठी या तरुणाने लाखो रुपये खर्च केले आहेत. या तरुणाने लांडग्यासारखे (Wolf) दिसण्यासाठी 18 लाख रुपये खर्च केले.
लांडग्यासारखा दिसण्यासाठी खर्च केले 18 लाख रुपये
मीडिया रिपोर्टनुसार, जपानमधील एका तरुणाने स्वतः लांडग्यासारखे दिसण्यासाठी तब्बल 18 लाख रुपये खर्च केले आहेत. या तरुणाने फक्त लांडगासारखा दिसण्यासाठी एवढा खर्च केला आहे. या तरुणाने हुबेहुब लांडग्यासारखा दिसण्यासाठी महागडा सूट बनवून घेतला आहे. या जपानमधील तरुणाने झेपेट नावाच्या कंपनीकडून 3,000,000 येन म्हणजे 18.5 लाख रुपये खर्च करून महागडा सूट तयार करुन घेतला आहे.
एकेकाची हौसच न्यारी, लांडग्यासारखा दिसतोय भारी
मिळालेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती जपानमधील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या व्यक्तीने आपली ओळख लपवली आहे. पण या व्यक्तीने त्याचा हुबेहुब लांडग्यासारख्या दिसणाऱ्या सूटची किंमत सांगितली आहे. सर्वात आधी या व्यक्तीने सूट बनवण्यासाठी झेपेट कंपनीशी संपर्क साधला आणि एक अल्ट्रा रिॲलिस्टिक वॉल्फ सूट तयार करून घेतला.
View this post on Instagram
यामागचं कारण काय?
या तरुणाने प्रतिक्रिया देताना सांगितले की, 'मला लहानपणापासून प्राण्यांची खूप आवड आहे. मी लहानपणी प्राण्यांसारखे दिसण्याचा प्रयत्न करायचो. मी खूप पूर्वी विचार केला की मला एखाद्या प्राण्यासारखे दिसले पाहिजे. मला बालपणापासूनच लांडग्यासारखं दिसण्याची इच्छा आहे.'
वॉल्फ सूट तयार करण्यासाठी लागले 50 दिवस
मीडिया रिपोर्टनुसार, या तरुणाने त्याच्या फिटिंग आणि मोजमाप देण्यासाठी अनेक वेळा स्टुडिओला भेट दिली होती. सूट बनवणाऱ्या झेपेट कंपनीने सांगितले की, 'ग्राहकाची मागणी लक्षात घेऊन आम्ही प्रत्येक लहान-लहान तपशील आणि माहिती घेऊन हुबेहुब लांडग्यासारखा दिसणार सूट तयार केला. हा सूट तयार करण्यासाठी सुमारे 50 दिवस लागले. हा लांडग्याचा सूट पाहून तरुण खूप खूश झाला. तो कंपनीच्या कामावर खूप प्रभावित झाला. त्याने जसा विचार केला होता अगदी त्याहूनही चांगल्या प्रकारे हा कोट तयार करण्यात आला आहे.'