![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Viral Video : Afreen गाण्यावर दोन तरूणांनी केला डान्स, त्यांच्या अदा पाहून तुम्हीही व्हाल थक्क
एक डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात दोन मुले "आफ़िरीन आफ़िरीन" गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.
Dance Viral Video : इंस्टाग्राम (Instagram) आता कोणासाठी नवीन राहीलेले नाही. आजकाल अनेक जण आपल्या सगळ्या कला जगासमोर दाखवण्याकरता सोशल मीडियाचा (Social Media) वापर करतात. त्यातल्या त्यात आता या सगळ्याकरता इंस्टाग्रामचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. इंस्टाग्रामवर बऱ्याचदा वेगवेगळे फिचर्स उपलब्ध करून दिले जातात. इंस्टाग्रामवर 90 सेकंदाचे कोणत्याही प्रकारचे व्हिडीओ तुम्ही टाकू शकता. असाच एक डान्सचा व्हिडीओ (Dance Video) नुकताच व्हायरल होत आहे. ज्यात दोन मुले "आफ़िरीन आफ़िरीन" गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. या दोन मुलांचा सुंदर डान्स पाहून नेटकरी हैराण झाले आहेत.
या व्हिडीओमध्ये त्या दोन मुलांनी गाण्याच्या शब्दांना साजेसे ड्रेस घातले आहेत. एकाने लाल रंगाचा कुर्ता तर दुसऱ्याने काळ्या रंगाचा. एका डान्सच्या वर्कशाॅपचा हा व्हिडीओ आहे. ज्यात या मुलांनी कंटेंप्ररी डान्सचा प्रकार केला आहे. "डान्स इंडिया डान्स", "डान्स प्लस" आणि झलक दिखला आजा" या रिअॅलिटी शो मुळे हा नृत्य शैलीचा प्रकार नावारूपास आला आहे. त्यामुळे आजकाल प्रत्येक जण अवगत असलेल्या कलेत काही ना काही वेगळे करण्याच्या प्रयत्नात असतो. सोशल मिडीयावर अशा कलेला मोठी दाद दिली जाते.
कोरीओग्राफर सिद्धार्थ दयानी त्याचा हा डान्स व्हिडीओ नुकताच त्याच्या इंस्टाग्रामवर टाकला आहे. ज्याखाली अतिशय मजेशीर कॅप्शन लिहिले आहे. तसेच व्हिडीओत त्याला साथ देणाऱ्याचे नावाचा उल्लेख त्याने केला आहे. व्हिडीओमध्ये दयानी आणि अलेक्झांडर भारतीय पोशाखात दिसत आहेत. गाणे जसे सुरू होते तसे ते नाचू लागतात. या डान्स दरम्यान ते काही इंटरेस्टिंग डान्स स्टेप्स दाखवतात. दोघांनी हसत आणि एकमेकांना मिठी मारून या व्हिडिओचा शेवट होतो.
[insta]
[/insta]हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर काहीच वेळात सोशल मिडीयावर धुमाकूळ घालत होता. हजारो लोकांनी या व्हिडीओला लाईक केले असून जवळपास कोट्यवधी लोकांनी व्हिडीओ पाहिला आहे. नेटकऱ्यांनी व्हिडीओवर अनेक कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरने लिहिलंय की, "अप्रतिम, फारच अप्रतिम". दुसऱ्याने लिहिले आहे, "कितीच सहजतेने नाचले आहेत, काय तो सुंदर नाच." तर अजून एकाने लिहिले आहे, "हा व्हिडीओ पाहून चेहऱ्यावरचे हसूच जात नाही. इतकाच छान डान्स केला आहे."
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)