Canada: लाखो विद्यार्थी, लाखो NRI... कॅनडात नेमके किती भारतीय लोक राहतात?
India Canada Conflict: भारत आणि कॅनडातील अंतर्गत संघर्ष इतका वाढला आहे की, कॅनडाला भारताकडून पुरवण्यात येणाऱ्या अनेक सेवा देखील भारताने खंडित केल्या आहेत.
India Canada Conflict : भारत आणि कॅनडा (Canada-India Issue) यांच्यातील राजनैतिक वादाचा मोठा फटका कॅनडाला (Canada) बसत आहे. कारण भारत (India) आणि कॅनडा या दोन देशांत अनेक सेवांची देवाण-घेवाण चालते, व्यापार चालतो, त्यातच आता भारताने कॅनडाला पुरवण्यात येणारी वीज सेवा अनिश्चित काळासाठी खंडित केली आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो (Justin Trudeau) यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमागे भारत सरकारचा हात असल्याचा आरोप केला. या आरोपानंतर भारत सरकारने हा निर्णय घेतला.
याआधी भारताने कॅनडात राहणाऱ्या भारतीयांना सुरक्षित राहण्याचं आवाहनही केलं होतं. भारत-कॅनडामधील वाढत्या संघर्षामुळे भारताने अनेक मोठे निर्णय घेतले आहेत, ज्याचा फटका कॅनडियन नागरिकांना बसू शकतो. यातच भारतीयांचा एक मोठा वर्ग कॅनडात राहतो, त्यामुळे भीती व्यक्त केली जात आहे.
नेमके किती भारतीय परदेशात राहतात?
सरकारी आकड्यांनुसार, भारतातील 13 कोटी लोक हे परदेशात राहतात, ज्यात कर्मचारी, प्रोफेशनल, एक्सपर्ट्स आणि विद्यार्थ्यांचा समावेश आहे. भारतातील एकूण 1,36,01,239 लोक विदेशात राहतात. युएई, सौदी अरब, कुवैत, कतार आणि ओमानला राहणाऱ्या भारतीयांचं प्रमाण सर्वाधिक आहे. युएईमध्ये सर्वाधिक 35.54 लाख भारतीय राहतात.
कॅनडात राहणाऱ्या भारतीयांची संख्या किती?
नुकतंच लोकसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर विदेश मंत्रालयाने कॅनडात राहणाऱ्या भारतीयांची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार, भारतातील 1 लाख 78 हजार 410 लोक कॅनडात राहतात. यात भारतीय कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, कॅनडात 1 लाख 78 हजार 410 एनआरआय राहतात, तर 15 लाख 10 हजार 645 पीआयओ (भारतीय वंशाचे नागरिक) राहतात.
कॅनडात शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या जास्त
कॅनडामध्ये दरवर्षी शिकण्यासाठी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. 2022 च्या आकडेवारीनुसार, कॅनडामध्ये 1 लाख 83 हजार 310 विद्यार्थी शिकत आहेत. कॅनडात शिकत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या जास्त असली तरी, यावेळी भारत आणि कॅनडात सुरु असलेल्या वादामुळे व्हिसा आणि इतर कामांना होणारा विलंब यामुळे ही संख्या कमी होऊ शकते. दुसरीकडे, कॅनडाला फी म्हणून मिळणाऱ्या रकमेत तोटा सहन करावा लागू शकतो.
कॅनडात राहणाऱ्या शिखांचं प्रमाणही जास्त
कॅनडाच्या 2021 च्या जनगणनेनुसार, कॅनडात लोकसंख्येच्या 2.1 टक्के शीख नागरिक राहतात. कॅनडात 7 लाख 71 हजार लोक राहतात. यातील काही शीख हे कॅनडाचे नागरिक आहेत, तर बाकीचे दुसऱ्या देशातून स्थलांतरित झालेले आहेत.
परदेशात कोणत्या राज्यातील लोक जास्त राहतात?
विदेश मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, उत्तर प्रदेशातील सर्वाधिक लोक परदेशात राहतात. उत्तर प्रदेशचे 2 लाख 58 हजार 15 लोक परदेशात राहतात. त्यानंतर बिहारचा नंबर लागतो, बिहारचे 1 लाख 31 हजार 725 लोक परदेशात राहतात. तर त्यानंतर पश्चिम बंगालमधील 64 हजार 844 लोक परदेशात राहतात.
हेही वाचा:
निज्जरच्या हत्येचे पुरावे अमेरिकेकडूनच, तरीही कॅनडानं...; न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानं खळबळ