Gaganyaan Mission: सूट-बूट आणि गळ्यात आयकार्ड; अंतराळात पाठवली जाणारी व्योममित्र आहे तरी कोण?
Gaganyaan Mission: व्योममित्र बद्दल जाणून घेण्यापूर्वी या नावाचा अर्थ पाहूया. वास्तविक, व्योममित्र हा शब्द दोन संस्कृत शब्दांपासून बनलेला आहे. पहिला शब्द व्योम म्हणजे अवकाश आणि दुसरा शब्द म्हणजे मित्र.
Gaganyaan Mission: भारताची गगनयान मोहीम (Gaganyaan Mission) यशस्वी वाटचाल करत आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून शनिवारी (21 ऑक्टोबर) सकाळी 10 वाजता इस्रोच्या शास्त्रज्ञांनी गगनयानचं क्रू मॉड्यूल यशस्वीपणे प्रक्षेपित (Crew Module Launched) केलं. सुरुवातीला त्याचं प्रक्षेपण (Launching) सकाळी 8.45 वाजता होणार होतं, परंतु काही त्रुटींमुळे ते काही काळ स्थगित करण्यात आलं होतं.
शनिवारी झालेल्या गगनयान मिशनच्या चाचणीला टेस्ट व्हेईकल अबॉर्ट मिशन-1 (Test Vehicle Abort Mission-1)आणि व्हेईकल डेव्हलपमेंट फ्लायंट (TV-D1) असंही म्हणतात. आता गगनयान मिशनशी संबंधित व्योममित्रबद्दल जाणून घेऊया, ज्याबद्दल सर्वांनाच अनेक प्रश्न आहेत.
गगन मिशनशी संबंधित व्योममित्र आहे तरी कोण?
व्योमित्र बद्दल जाणून घेण्यापूर्वी त्या नावाचा अर्थ जाणून घेऊया. वास्तविक, व्योमित्र हा दोन संस्कृत शब्दांपासून बनलेला आहे. 'व्योममित्र' शब्द संस्कृत भाषेतील दोन शब्द 'व्योम' आणि 'मित्र' यांना जोडून बनला आहे, ज्याचा अर्थ क्रमशः अवकाश आणि मित्र असा होतो. म्हणजेच व्योममित्र म्हणजे जो अवकाशाचा मित्र आहे, ज्याला अवकाशाबद्दल सामान्य माणसापेक्षा जास्त माहिती आहे.
व्योममित्र ही भारताच्या गगनयान या अंतराळ मोहिमेत पाठवली जाणारी महिला रोबोट आहे. हा ISRO द्वारा विकसित हाफ-ह्यूमनॉइड फीमेल रोबोटचा प्रोटोटाईप आहे. प्रत्यक्षात ही एक महिला ह्यूनॉइड आहे, जिने 2021 मध्ये ह्युमन स्पेसफ्लाइट अँड एक्सलरेशन दरम्यान प्रथमच तिची उपस्थिती दर्शवली.
गगनयान मोहिमेत व्योमित्रचं योगदान
गगनयान मोहिमेसोबत व्योममित्र अंतराळातील सर्व प्रकारच्या मानवी क्रियाकलापांचं अनुकरण करेल. हा रोबोट इस्रोला अंतराळातून अहवाल पाठवेल. तो तेथील पर्यावरण नियंत्रण लाईफ सपोर्ट सिस्टीमसोबतही काम करेल. यासोबत व्योममित्र गगनयान मिशनच्या मॉड्यूल पॅरामीटर्सचंही निरीक्षण करेल. व्योमित्र मॉड्युलसाठी अलर्ट पाठवणं, लाईफ सपोर्ट आणि स्विच पॅनल ऑपरेशनचं कामही करू शकतं. हाफ ह्यूमनॉइड व्योममित्रा प्रश्नांची उत्तरंही देऊ शकते. हाफ ह्यूमनॉइड हे नाव यासाठी ठेवण्यात आलं आहे, कारण या रोबोटला पाय नाहीत.
गगनयान भारताची पहिली मानवी अंतराळ मोहिम
गगनयानही इस्रोची पहिली मानवी अंतराळ मोहिम असेल. इस्रोची गगनयान मोहिम तीन टप्प्यांत असेल. दोन मोहिमा मानवरहित तर तिसरी मोहिम मानवी अंतराळ मोहिम असेल. पहिल्या टप्प्यात गगनयान मोहिमेत व्योमित्र नावाचा रोबोट अंतराळात पाठवण्यात येणार आहे. गगनयान मोहिमेत मानवासाठी अनूकुलता आणि सुरक्षितता तपासण्यासाठी आधी रोबोट अवकाशात पाठवला जाईल.
हेही वाचा:
Gaganyaan Mission: भारताची आणखी एक गगनभरारी; 'गगनयान' प्रो मॉड्यूलची चाचणी यशस्वी