एक्स्प्लोर

Gaganyaan Mission: भारताची आणखी एक गगनभरारी; 'गगनयान' प्रो मॉड्यूलची चाचणी यशस्वी

Gaganyaan Mission Test Flight Launch: गगनयानाच्या प्रो मॉड्युलची चाचणी यशस्वी झाली असून इस्रोनो गगनयान मोहिमेमध्ये आपलं आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे.

Gaganyaan Mission Test Flight Launch Updates: मोठ्या अडथळ्यांची शर्यत आणि आव्हानांचा सामना करुन अखेर भारताच्या ‘गगनयान’च्या (Gaganyaan) प्रो मॉड्युलनं गगनभरारी घेतली. गगनयान अभियानाची पहिली चाचणी यशस्वी झाली. या यशस्वी चाचणीमुळे भारतानं अवकाश मोहिमेत आणखी एक इतिहास रचला आहे. रविवारी सकाळी 10 च्या सुमारास इस्रोच्या श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन गगनयानचं क्रू मॉडेल लाँच करण्यात आलं. यालाच टेस्ट व्हिकल अबॉर्ट मिशन-1   (Test Vehicle Abort Mission -1) आणि टेस्ट व्हिकल डेवलपमेंट फ्लाईट (TV-D1) असंही म्हणलं जात आहे.

इस्रोच्या गगनयान मोहिमेअंतर्गत श्रीहरीकोटा इथे काही क्षणात पहिलं चाचणी उड्डाण प्रक्षेपित करण्यात आलं. आधी ही चाचणी खराब हवामान आणि  तांत्रिक कारणामुळे रद्द करण्याची घोषणा झाली होती. मात्र आता तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या असून उड्डाण चाचणी सकाळी दहा वाजता करण्यात आली. दरम्यान, गगनयान मोहिमेदरम्यान अंतराळवीरांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हे चाचणी उड्डाण करण्यात येणार आहे. या चाचणी दरम्यान मॉड्यूल अंतराळात नेलं जाईल. त्यानंतर ते ठराविक उंचीपर्यंत नेऊन पुन्हा पृथ्वीवर परत आणून बंगालच्या उपसागरात उतरवले जाईल. इस्रोकडून या उड्डाण चाचणीला अबॉर्ट टेस्ट असं नाव देण्यात आलं आहे.

इस्रोसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. गगनयान मोहिमेची पहिली मोठी चाचणी आज यशस्वीरित्या पार पडली. गगनयान मोहीम यशस्वी करण्यासाठी इस्रोचे शास्त्रज्ञ पूर्ण तयारी करत आहेत. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) भारताच्या गगनयान मोहिमेच्या प्रक्षेपणाच्या दिशेनं क्रू एस्केप सिस्टम (CES) चं पहिलं चाचणी उड्डाण करण्यात आलं. शनिवारी गगनयान मोहिमेदरम्यान, रॉकेटमध्ये बिघाड झाल्यास अंतराळवीरांना सुरक्षितपणे पृथ्वीवर आणणारी क्रू एस्केप सिस्टम (Crew Escape System) चाचणी करण्यात आली. अशा मोहिमेतील अंतराळवीरांच्या सुरक्षेसाठी ही चाचणी अत्यंत महत्त्वाची आहे. 

क्रू एस्केप सिस्टम टेस्टिंग म्हणजे नेमकं काय?

सोप्या भाषेत समजून घ्यायचं झालं तर, मोहिमेदरम्यान काही चूक झाली, तर भारतीय अवकाशातील अंतराळवीरांना सुरक्षितपणे पृथ्वीवर कसं आणलं जाईल? त्याची चाचणी आज होणार आहे. भारतीय अंतराळ संस्था इस्रो गगनयान मोहिमेच्या क्रू एस्केप सिस्टमची चाचणी घेणार आहे. यासाठी पहिली मोठी चाचणी होणार आहे. या चाचणीमध्ये रॉकेटमध्ये काही बिघाड झाल्यास अंतराळवीरांना सुरक्षितपणे पृथ्वीवर आणणाऱ्या यंत्रणेची चाचणी घेतली जाणार आहे. यामध्ये श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून टेस्ट व्हेईकल अॅबॉर्ट मिशन टीव्ही-डी1 लाँच करण्यात येणार आहे. या फ्लाईटचे तीन भाग असतील - सिंगल स्टेज लिक्विड रॉकेट, क्रू मॉड्यूल आणि क्रू एस्केप सिस्टम.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र, सुधारित दर लागू करणार, आशिष शेलार यांची घोषणा
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र : आशिष शेलार
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7PM 26 March 2025Devendra Fadanvis : मला वाटलं जितेंद्र आव्हाडांना जेलमध्ये टाकायचय..फडणवीस भर सभागृहात असं का म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 6 PM TOP Headlines 6PM 26 March 2025Uddhav Thackeray Video | उद्धव ठाकरे हरामखोर कुणाला म्हणाले? राम कदम यांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र, सुधारित दर लागू करणार, आशिष शेलार यांची घोषणा
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र : आशिष शेलार
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
रमजान ईदसाठी घराची साफसफाई; कुलरचा शॉक लागून सख्ख्या जावांचा मृत्यू, गावावर शोककळा
रमजान ईदसाठी घराची साफसफाई; कुलरचा शॉक लागून सख्ख्या जावांचा मृत्यू, गावावर शोककळा
‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!
‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!
संभाजीराजेंनी इतिहास समजून घ्यावा, मगच...; वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन इतिहास अभ्यासक सोनवणींचा सल्ला
संभाजीराजेंनी इतिहास समजून घ्यावा, मगच...; वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन इतिहास अभ्यासक सोनवणींचा सल्ला
Embed widget