Anand Mahindra : 1999 मध्ये लाँच झाले होते महिंद्राचे पहिले इलेक्ट्रिक वाहन, आनंद महिंद्रांनी शेअर केली मनोरंजक गोष्ट
Anand Mahindra : जागतिक ईव्ही दिनानिमित्त, ज्येष्ठ उद्योगपतीं महिंद्रा समूहाच्या पहिल्या ईव्हीबद्दल एक मनोरंजक गोष्ट शेअर केली आहे.
Anand Mahindra Share First EV Story : प्रसिद्ध उद्योगपती आणि महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा (Anand Mahindra) सोशल मीडियावर अनेकदा त्यांच्या पोस्टमुळे चर्चेत राहतात. बर्याचदा ते त्यांच्या पोस्टद्वारे व्यवसाय, आर्थिक आणि जीवनाबद्दल प्रेरणात्मक पोस्ट करत असतात. ते अनेक मनोरंजक कथा देखील शेअर करतात. अलीकडे, जागतिक ईव्ही दिनानिमित्त, ज्येष्ठ उद्योगपती महिंद्रा यांनी समूहाच्या पहिल्या ईव्हीबद्दल एक मनोरंजक गोष्ट शेअर केली आहे. महिंद्रा ग्रुपने बनवलेल्या पहिल्या थ्री व्हीलर ईव्हीबद्दल बोलताना आनंद महिंद्रा सांगतात की, ही ईव्ही खूप आधी आली होती, पण मागणीअभावी ती जास्त काळ टिकू शकली नाही.
महिंद्रा ग्रुपची पहिली ईव्ही कोणी बनवली?
महिंद्राने सांगितले की, इलेक्ट्रिक वाहन कंपनीचे दिग्गज नगरकर यांनी त्यांच्या सेवानिवृत्तीपूर्वी डिझाइन केले होते, परंतु तीन चाकी ईव्ही भारतीय बाजारपेठेत आपले स्थान निर्माण करू शकली नाही. त्यानंतर या वाहनाला अवघ्या काही काळात अलविदा केल्याचे सांगण्यात आले.
Today is #WorldEVDay And it has propelled me back into the past. 1999 to be precise, when a stalwart of @MahindraRise Mr. Nagarkar, created our first ever EV—the 3 wheeler BIJLEE. It was his gift to us before retirement. I’ll never forget his words then: He wanted to do something… pic.twitter.com/f9KIXr1lkp
— anand mahindra (@anandmahindra) September 9, 2023
आज जागतिक EV दिवस
X प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करताना, आनंद महिंद्रा म्हणतात, आज जागतिक EV दिवस आहे, हा दिवस मला भूतकाळात घेऊन गेला आहे. ते म्हणाले की 1999 मध्ये @MahindraRise चे दिग्गज नगरकर यांनी आमची पहिली EV- 3 व्हीलर BIJLEE तयार केली. निवृत्तीपूर्वीची ही त्यांची भेट होती. त्यांचे शब्द मी कधीही विसरणार नाही.
महिंद्राच्या पहिल्या EV ला बाजारात का स्थान मिळाले नाही?
आनंद महिंद्रा म्हणाले की बिजली ईव्ही तेव्हाच्या वेळेपेक्षा खूप पुढे होती. यामुळे ती बाजारात जास्त काळ टिकू शकली नाही. ते म्हणाले की, याच कारणामुळे आम्ही काही वर्षांच्या निर्मितीनंतर याच्या उत्पादनाला निरोप दिला. आनंद महिंद्रा म्हणाले की, ही कथा आम्हाला सतत प्रेरणा देत आहे आणि आम्ही तिचा आणखी विस्तार करण्यावर भर देत राहू.
BIJLEE परत आणण्याचे आवाहन
महिंद्रांनी ही गोष्ट शेअर केल्यानंतर लोकांनी अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या. काही लोकांनी ते वाहन परत आणण्याचे आवाहनही केले. काहींनी टेस्ला आणि बीवायडी या परदेशी कंपन्यांच्या विरोधात नवीन उत्पादने सादर करण्याचा सल्ला दिला.