एक्स्प्लोर

एअर इंडियाच्या जेवणात धारदार ब्लेड, भाजी चिरण्याच्या मशीनचा पार्ट थेट ताटापर्यंत; Video Viral

Blade in Air India Food : भाजी चिरण्याच्या मशीनचा एक पार्ट जेवण बनवताना जेवणात पडला आणि तो थेट एअर इंडियाच्या प्रवाशाच्या ताटापर्यंत पोहोचला.

मुंबई : एकीकडे आईस्क्रीममध्ये (Ice Cream) माणसाचं बोट आणि गोम सापडल्यानंतर आता एअर इंडियाच्या (Air India) जेवणात एका प्रवाशाला चक्क धारदार ब्लेड (Blade) सापडलं आहे. या घटनेमुळे एकच खळबळ माजली आहे. एअर इंडियाच्या बंगळुरू ते सॅन फ्रॅन्सिसको विमानात मॅथ्युरेस पॉल हा प्रवासी जेवत असताना त्याला टणक वस्तू जाणवली. पाहतो तर काय, ती वस्तू म्हणजे ब्लेड होतं. धक्कादायक बाब म्हणजे भाजी चिरण्याच्या मशीनचा एक पार्ट जेवणात पडला आणि तो थेट एअर इंडियाच्या प्रवाशाच्या ताटापर्यंत पोहोचला.

एअर इंडियाच्या जेवणात ब्लेड सापडलं

एअर इंडियाच्या प्रवाशाला जेवणात ब्लेड सापडल्याने एअर इंडियाच्या फ्लाईटमधील जेवणाच्या दर्जावरही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. जेवण बनवताना, भाज्या चिरायच्या मशीनमधून एक पार्ट पडला आणि तो थेट जेवणाच्या ताटापर्यंत पोहोचला. खुद्द एअर इंडियानेच तशी कबुली दिली आहे. भरपाई म्हणून कंपनीनं मॅथ्युरेसला वर्षभर वैध असलेलं बिझनेस क्लासचं तिकीट देऊ केलं. मात्र ती एक प्रकारची लाच आहे, असं म्हणत त्यानं ते तिकीट नाकारलं.

प्रवाशाची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल

एअर इंडियाने मागितली माफी

एअर इंडियाच्या आंतरराष्ट्रीय विमानात एका प्रवाशाच्या जेवणात ब्लेड सापडलं. प्रवाशाने स्वतः सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली. या पोस्टनंतर, रविवारी, 16 जून रोजी एअर इंडियाने एक निवेदन जारी करून प्रवाशांच्या जेवणात ब्लेड आढळल्याची वस्तुस्थिती स्वीकारली आणि या प्रकरणी माफी मागितली.  

चाटमध्ये धारदार धातूचा तुकडा सापडला

मॅथुरेस पॉल नावाचा प्रवासी एअर इंडियाच्या विमानाने बेंगळुरूहून सॅन फ्रान्सिस्कोला जात होता. 10 जून रोजी, पॉलने X वर एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये अन्नामध्ये सापडलेल्या ब्लेडचे दोन फोटो शेअर केले. पॉलने फोटो शेअर करत पोस्टमध्ये लिहिले की, एअर इंडियाचे अन्न चाकूसारखे कापू शकते. भाजलेल्या रताळे आणि अंजीर चाटमध्ये धातूचा तुकडा सापडला, जो ब्लेडसारखा दिसत होता. हे अन्न काही सेकंद चघळल्यानंतरच लक्षात आले. सुदैवाने, मला इजा झालेली नाही.

पाहा व्हिडीओ : एअर इंडियाच्या जेवणात ब्लेड

महत्त्वाच्या इतर बातम्या :

आईस्क्रीममध्ये गोम सापडली! अमूल कंपनीने घेतली दखल; तपासणीसाठी महिलेकडून Ice Creamचा डबा परत मागवला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Asha Bhosle : माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
Maharashtra Budget 2024: लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा... महायुती सरकारकडून महिलांसाठी धडाधड योजनांची घोषणा अन् पैशांचा पाऊस
मुख्यमंत्री लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा... महायुती सरकारकडून महिलांसाठी धडाधड योजनांची घोषणा अन् पैशांचा पाऊस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vijay Wadettiwar Assembly Session : शेतकऱ्यांवर GST लावला, मध्ये बोलू नका... वडेट्टीवार कुणावर भडकलेCM Eknath Shinde on Drugs : ड्रग्ज संपेपर्यंत कारवाई थांबणार नाही - एकनाथ शिंदेDhananjay Munde on Jayant Patil :शेतकऱ्यांना मदतीचा मुद्दा, धनंजय मुंडे धावले अनिल पाटलांच्या मदतीलाPorsche Car Accident : पोर्शे कार अपघात प्रकरणावर पावसाळी अधिवेशनात चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asha Bhosle : माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
Maharashtra Budget 2024: लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा... महायुती सरकारकडून महिलांसाठी धडाधड योजनांची घोषणा अन् पैशांचा पाऊस
मुख्यमंत्री लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा... महायुती सरकारकडून महिलांसाठी धडाधड योजनांची घोषणा अन् पैशांचा पाऊस
Pankaj Jawale : लाचखोर मनपा आयुक्त पंकज जावळे फरार, सोलापुरातील घरी एसीबीचे पथक दाखल, झाडाझडतीत काय सापडलं?
लाचखोर मनपा आयुक्त पंकज जावळे फरार, सोलापुरातील घरी एसीबीचे पथक दाखल, झाडाझडतीत काय सापडलं?
अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस; 3 सिलेंडर मोफत, महिन्याला 1500 रुपये, अजित पवारांच्या 'बजेट'मधील टॉप 10 घोषणा
अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस; 3 सिलेंडर मोफत, महिन्याला 1500 रुपये, अजित पवारांच्या 'बजेट'मधील टॉप 10 घोषणा
Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z 
राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z 
Ladki Bahin Yojana : महिलांना महिन्याला दीड हजार, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नेमकी काय?
महिलांना महिन्याला दीड हजार, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नेमकी काय?
Embed widget