एक्स्प्लोर

आईस्क्रीममध्ये गोम सापडली! अमूल कंपनीने घेतली दखल; तपासणीसाठी महिलेकडून Ice Creamचा डबा परत मागवला

Centipede was found in Amul Ice Cream : आईस्क्रीममध्ये गोम आढळून आल्याप्रकरणी अमूलने दखल घेत महिलेकडून आईस्क्रीमचा डब्बा तात्काळ तपासणीसाठी परत मागवला आहे.

मुंबई : डेअरी प्रोडक्ट निर्माती (Dairy Products) प्रसिद्ध कंपनी अमूलवर (Amul) मोठा गंभीर आरोप करण्यात आला आहे. अमूल कंपनीच्या आईस्क्रीममध्ये गोम आढळल्याची तक्रार (Centipede was found in Amul Ice Cream) एका महिलेकडून करण्यात आली. एकीकडे काही दिवसांपूर्वीच मुंबईमध्ये आईस्क्रीममध्ये माणसाचं बोट आढळल्याची घटना ताजी असताना नोएडातील एका महिलेला अमूल आईस्क्रीमच्या डब्यात मृत गोम आढळली. या प्रकरणी महिलेने तक्रार केली होती. अमूल कंपनीने आता या तक्रारीची दखल घेतली आहे.

अमूल आईस्क्रीममध्ये गोम सापडली

नोएडातील एका महिलेने अमूल कंपनीच्या आईस्क्रीमच्या डब्यामध्ये (Centipede was found in Amul Ice Cream) गोम सापडल्याचा दावा केला होता. या महिलेने आईस्क्रीममध्यो गोम सापडल्याचा व्हिडीओही शेअर केला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याच्या काही दिवसांनंतर आता अमूल कंपनीने महिलेच्या तक्रारीची दखल घेतली. अमूल कंपनीन सोमवारी महिलेला आईस्क्रीमचा डबा पुढील तपासणीसाठी परत कंपनीकडे पाठवण्याची विनंती केली आहे.

अमूल कंपनीने तपासणीसाठी महिलेकडून आईस्क्रीमचा डबा मागवला

अमूल कंपनीकडे डेअरी प्रोडक्ट्ससाठीचा एक विश्वासू ब्रँड म्हणून ओळखलं जातं. पण, या तक्रारीमुळे आता अमूल प्रोडक्ट्सच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. नोएडातील एका महिलेने अमूल कंपनीच्या आईस्क्रीमचा टब ऑर्डर केला होता. हा आईस्क्रीमच्या डबा उघडताना महिलेला आतमध्ये मृत गोम सापडली. आता अमूल कंपनीने टेस्टिंगसाठी आईस्क्रीम टब परत मागवला आहे. 

महिलेला आईस्क्रीमचे पैसे परत

आईस्क्रीममध्ये गोम आढळून आल्याचे प्रकरण अमूलला कळताच कंपनीने तात्काळ कारवाईसाठी पाऊल उचलली आहेत. सर्वात आधी अमूल कंपनीने सोमवारी महिलेकडून आईस्क्रीमचा टब तपासणीसाठी परत मागवला. महिलेला पैसेही परत करण्यात आले आहेत.

अमूल कंपनीकडून तक्रारीची दखल घेत कारवाई

या प्रकरणाची माहिती अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनीही तपास सुरू केला. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की,  ऑनलाइन इन्स्टंट डिलिव्हरी ॲपद्वारे महिलेने आईस्क्रीम ऑर्डर केली होती. महिलेने आईस्क्रीमचा टब उघडला तेव्हा तिच्या आत एक गोम असल्याचा दावा महिलेने केला आहे. महिलेने तत्काळ ॲपच्या ऑनलाइन हेल्पलाइन क्रमांकावर तक्रार केली. त्यानंतर त्यांना पैसे परत करण्यात आले.

अन्न विभागाकडून प्रकरणाचा तपास सुरू

दरम्यान, या प्रकरणाची माहिती मिळताच अन्न सुरक्षा विभागाकडून कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. अन्न आणि पुरवठा विभागाचे पथक ज्या दुकानातून आईस्क्रीम पाठवले होते, तेथे पोहोचले आणि आईस्क्रीम विक्रीवर बंदी घातली. दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असं अन्न आणि पुरवठा विभागाने सांगितलं आहे.

अमूल कंपनीने या प्रकरणावर काय स्पष्टीकरण दिलं?

अमूल कंपनीने या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, महिला ग्राहकाला झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आम्ही सतत ग्राहकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्याच दिवशी आम्ही रात्री 9.30 नंतर भेटण्याबाबत बोललो. ग्राहकांच्या भेटीदरम्यान आम्ही आईस्क्रीमचा डबाही मागितला जेणेकरून त्याची तपासणी करता येईल. पण, महिलेने डबा देण्यास नकार दिला. महिला ग्राहकाकडून आईस्क्रीम टब परत मिळेपर्यंत या प्रकरणाचा तपास करणे आमच्यासाठी अवघड असल्याचे अमूलचे म्हणणे आहे. ही घटना आमच्या पॅकिंग आणि पुरवठा साखळीसाठी देखील मोठी समस्या आहे.

50 हून अधिक देशांमध्ये अमूलचे ग्राहक

अमूलने सांगितलं की, अमूलचा प्लांट आयएसओ प्रमाणित आहे. येथे विविध गुणवत्तेच्या तपासणीनंतर, आम्ही कोणतेही उत्पादन लोकांपर्यंत पोहोचवलं जातं. याशिवाय अमूलने ग्राहकाला त्यांच्या प्लांटला भेट देण्याचे आवाहन केलं आहे. जेणेकरून, तेथील प्रक्रिया आणि उत्पादन कार्यात किती स्वच्छता आणि उच्च दर्जाचे पालन केले जाते, हे पाहता येईल. अमूलने सांगितले की, अमूलची उत्पादने 50 हून अधिक देशांमध्ये विकली जातात. आम्ही आमच्या उत्पादनांमध्ये अन्न सुरक्षिततेच्या सर्वोच्च मानकांचे पालन करतो. तसेच ग्राहकांना आरोग्यदायी आणि उच्च पौष्टिक उत्पादने पुरवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

आता आईस्क्रीममध्ये सापडली गोम, महिलेचा अमूल कंपनीवर गंभीर आरोप; VIDEO VIRAL

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Budget 2024 :  कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
Asha Bhosle : माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vijay Wadettiwar Assembly Session : शेतकऱ्यांवर GST लावला, मध्ये बोलू नका... वडेट्टीवार कुणावर भडकलेCM Eknath Shinde on Drugs : ड्रग्ज संपेपर्यंत कारवाई थांबणार नाही - एकनाथ शिंदेDhananjay Munde on Jayant Patil :शेतकऱ्यांना मदतीचा मुद्दा, धनंजय मुंडे धावले अनिल पाटलांच्या मदतीलाPorsche Car Accident : पोर्शे कार अपघात प्रकरणावर पावसाळी अधिवेशनात चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Budget 2024 :  कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
Asha Bhosle : माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
Maharashtra Budget 2024: लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा... महायुती सरकारकडून महिलांसाठी धडाधड योजनांची घोषणा अन् पैशांचा पाऊस
मुख्यमंत्री लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा... महायुती सरकारकडून महिलांसाठी धडाधड योजनांची घोषणा अन् पैशांचा पाऊस
Pankaj Jawale : लाचखोर मनपा आयुक्त पंकज जावळे फरार, सोलापुरातील घरी एसीबीचे पथक दाखल, झाडाझडतीत काय सापडलं?
लाचखोर मनपा आयुक्त पंकज जावळे फरार, सोलापुरातील घरी एसीबीचे पथक दाखल, झाडाझडतीत काय सापडलं?
अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस; 3 सिलेंडर मोफत, महिन्याला 1500 रुपये, अजित पवारांच्या 'बजेट'मधील टॉप 10 घोषणा
अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस; 3 सिलेंडर मोफत, महिन्याला 1500 रुपये, अजित पवारांच्या 'बजेट'मधील टॉप 10 घोषणा
Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z 
राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z 
Embed widget