ABP Majha Top 10, 8 February 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 8 February 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
बापाने खेळायला मोबाईल दिला, पोरानं मात्र 'गेमच' केला; 6 वर्षाच्या मुलानं दिली तब्बल 80 हजार रुपयांच्या जेवणाची ऑर्डर, सोबत 25 टक्के टीपही
ऑर्डर देऊन मुलगा झोपायला गेला आणि त्याच्या घरासमोर फूड डिलिव्हरी कंपन्यांच्या गाड्यांची रांग लागली. मात्र त्या मुलाच्या वडिलांना याची काहीही कल्पना नव्हती. Read More
Rakhi sawant-Adil Khan Durrani : राखीचा पती आदिल दुर्रानीला कोर्टाने सुनावली न्यायालयीन कोठडी
आदिल खान दुर्रानीला (Adil Khan Durrani) अंधेरी कोर्टाने आज (8 फेब्रुवारी) न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. Read More
आईचं दूध कोण प्यायलंय याचा निर्णय श्रीनगरच्या लाल चौकात होईल, तिरंग्याच्या मुद्द्यावरुन नरेंद्र मोदींचं दहशतवाद्यांना आव्हान- संसदेत सांगितला किस्सा
PM Narendra Modi Speech: आईचं दूध प्यायला असाल तर श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवून दाखवा, असं आव्हान दहशतवाद्यांनी नरेंद्र मोदी यांना दिलं होतं. त्यावर मोदी यांनी प्रतिआव्हान देत तिरंगा फडकवला. Read More
दैव बलवत्तर म्हणूनच... विध्वंसकारी भूकंपातून सुखरुप बचावला तीन वर्षांचा निष्पाप जीव, Video Viral
Turkey Earthquake: 19 सेकंदाच्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एका लहान मुलाचं रेस्क्यू ऑपरेशन केल्याचं दिसतंय. Read More
Rajinikanth-Hema Malini : रजनीकांत आणि हेमा मालिनी यांचा 'अंधा कानून' ओटीटीवर, 1983 च्या सुपरहीट चित्रपटाचा 2023 मध्ये थरार
Rajinikanth -Hema Malini : 'अंधा कानून' हा चित्रपट 1983 साली प्रदर्शित झाला होता. अंधा कानून या चित्रपटात हेमा मालिनी आणि रजनीकांत एकांच कुटूंबाचा भाग आहेत. Read More
Vaalvi 2 : 'वाळवी 2' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला! झी स्टुडिओजने केली घोषणा
Vaalvi 2 : 'वाळवी' सिनेमाला मिळालेल्या यशानंतर झी स्टुडिओजने या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची घोषणा केली आहे. Read More
Khelo India: खेलो इंडियामध्ये महाराष्ट्राच्या पदकांचे शतक; स्पर्धेत राज्याच्या खेळाडूंचा दबदबा
Khelo India Youth Games : महाराष्ट्राच्या खेळाडूंनी खेलो इंडियाच्या पाचव्या पर्वातही आपली मक्तेदारी राखली. सलग पाचव्या स्पर्धेत पदकांचे शतक ओलांडत महाराष्ट्राने या स्पर्धेतील आपले वर्चस्व सिद्ध केले. Read More
Junior National Carrom Championship : ज्युनिअर राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत तामिळनाडूच्या खेळाडूंची हवा, मुलांमध्ये के. नवीनकुमार तर मुलींमध्ये एम. खाझिमा विजयी
Carrom Championship : ज्युनिअर राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत 18 वर्षाखालील गटात मुलांमध्ये तामिळनाडूच्या के. नवीनकुमारने तर मुलींच्या एकेरीच्या अंतिम फेरीत तामिळनाडूच्या एम. खाझिमाने विजय मिळवला. Read More
Health Tips : व्हिटॅमिन-डी शरीरासाठी आवश्यक; रोज किती गोळ्या घ्याव्यात ते जाणून घ्या
Vitamin D for Health : व्हिटॅमिन डी शरीराला कॅल्शियम शोषण्यास मदत करते, जे मजबूत हाडांसाठी आवश्यक आहे. Read More
Repo Rate: रेपो रेटमध्ये सलग सहाव्यांदा वाढ; 30 लाखांच्या होम लोनवर किती वाढणार EMI? असा करा कॅलक्युलेट
RBI चं द्वैमासिक पतधोरण जाहीर झालं असून रेपो रेट 25 बेसिस पॉईंटनी वाढवला आहे. आता रेपो रेट साडे सहा टक्क्यांवर आला आहे. Read More