एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Repo Rate: रेपो रेटमध्ये सलग सहाव्यांदा वाढ; 30 लाखांच्या होम लोनवर किती वाढणार EMI? असा करा कॅलक्युलेट

RBI चं द्वैमासिक पतधोरण जाहीर झालं असून रेपो रेट 25 बेसिस पॉईंटनी वाढवला आहे. आता रेपो रेट साडे सहा टक्क्यांवर आला आहे.

Repo Rate: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) पुन्हा एकदा सर्वसामान्यांना झटका दिला आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांनी वाढ केली आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये सलग सहाव्यांदा वाढ केली आहे. रेपो रेट 6.25 टक्क्यांवरुन 6.50 टक्के झाला आहे. या दरवाढीमुळे ऑटो, गृह कर्जासह सर्व प्रकारची कर्ज महाग होतील. परिणामी ग्राहकांना जास्त ईएमआय भरावा लागेल. विशेष म्हणजे, देशातील महागाई नियंत्रणात आल्यानंतरही आरबीआयनं दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

देशातील महागाई (Inflation) दर कमी होत असला तरी सर्वसामान्यांवर महागाईचा बोजा वाढतोय. बुधवारी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) नं रेपो रेटमध्ये (Repo Rate Hike) 25 बेस पॉइंट्स म्हणजेच, 0.25 टक्क्यांनी वाढ करून आणखी एक धक्का दिला आहे. गेल्या वर्षी, मे 2022 पासून आतापर्यंत, रेपो रेट सलग सहा वेळा वाढला आहे आणि या कालावधीत तो एकूण 2.50 ने वाढला आहे. सध्या रेपो दर 6.50 टक्क्यांवर पोहोचला आहे. या वाढीमुळे सर्व प्रकारची होम, ऑटो, पर्सनल लोन (Loan) महाग झालं आहे आणि लोकांना जास्त EMI भरावं लागत आहेत. आज कलेल्या वाढीनंतर EMI ची गणितं कशी असतील? 

मे 2022 पासून कसा वाढत गेला Repo Rate? 

सहा फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या आरबीआयच्या एमपीसी बैठकीत (RBI MPC Meet) संमत झालेल्या ठरावांची घोषणा बुधवारी 8 फेब्रुवारी रोजी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shakti Kant Das) यांनी केली. त्यांनी सांगितलं की, बैठकीत उपस्थित असलेल्या सहा सदस्यांपैकी चार सदस्यांनी रेपो दरात वाढ करण्याचं समर्थन केलं आहे. दरम्यान, कोरोना काळात रेपो रेट 4 टक्क्यांवर स्थिर होता. परंतु त्यानंतर देशातील महागाईचा उच्च स्तर नियंत्रित करण्यासाठी, मे 2022 पासून आत्तापर्यंत, आरबीआयनं सलग सहाव्यांदा रेपो रेटमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. 

गेल्याच वर्षी मे महिन्यात रेपो रेटमध्ये 0.40 टक्के, जूनमध्ये 0.50 टक्के, ऑगस्टमध्ये 0.50 टक्के, सप्टेंबरमध्ये 0.50 टक्के आणि डिसेंबरमध्ये 0.35 टक्क्यांची वाढ करण्यात आली होती. तर यावर्षी 2023 च्या पहिल्या एमपीसी बैठकीत पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आली असून आज रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

30 लाखांच्या कर्जाचा बोजा नेमका किती वाढला? 

सलग सहाव्यांदा रेपो दरात वाढ झाल्यानंतर अर्थातच कर्जदाराचा EMI वाढणार आहे. वाढलेल्या रेपो रेटचा तुमच्या ईएमआयवर कसा परिणाम होणार? हे समजून घेण्यासाठी एक उदाहरण पाहुयात... 

आपण असं गृहीत धरू की, एका व्यक्तीनं मे 2022 मध्ये रेपो रेटमध्ये पहिली वाढ होण्यापूर्वी 20 वर्षांच्या कालावधीसाठी 6.7 टक्के व्याजदरानं 30 लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं. या दरानं, त्याला दरमहा 22,722 रुपये EMI भरावा लागले.

दुसरीकडे, RBI ने सलग सहा वेळा वाढ करत रेपो रेट 2.50 टक्क्यांनी वाढवल्यानंतर, त्या कर्जाचा दर 9.2 टक्क्यांपर्यंत वाढला असेल, तर त्यानुसार EMI प्रति महिना 27,379 रुपये होईल. म्हणजेच, आता त्या व्यक्तीला दरमहा 4,657 रुपये अधिक खर्च करावे लागतील.

ऑटो लोनचं EMI कॅलक्युलेशन कसं असेल? 

वाढलेल्या रेपो रेटचा ऑटो लोनवर (Auto Loan) कसा परिणाम होणार? हे जाणून घेण्यासाठी एक उदाहरण पाहुयात... 

एखाद्या व्यक्तीनं 10 लाख रुपयांची कार खरेदी केली आणि त्यावर 5 वर्षांसाठी 8 लाख रुपयांचे कर्ज घेतले. रेपो दरात वाढ होण्यापूर्वी तुम्ही हे वाहन कर्ज 6 टक्के दरानं घेतले होते. त्यानुसार, तुम्हाला दरमहा 15,466 रुपये EMI म्हणून भरावे लागतील. आता जर कर्जाचा व्याजदर 8.50 पर्यंत वाढला असता, तर तुमचा EMI देखील 16,413 रुपये झाला आहे. म्हणजेच, तुमच्यावर दरमहा 947 रुपयांचा बोजा वाढणार आहे.

रेपो रेट वाढल्यानं तुमचा EMI वाढतो 

आरबीआयद्वारे वाढवण्यात आलेला रेपो रेटमुळे थेट बँकेच्या कर्जावर परिणाम होतो. जेव्हा रेपो रेट कमी होतो, तेव्हा कर्ज स्वस्त होतं आणि ज्यावेळी रेपो रेट वाढतो, त्यावेळी बँका देखील त्यांचं कर्ज महाग करतात. त्याचा परिणाम होम लोन (Home Loan), ऑटो लोन  (Auto Loan), पर्सनल लोन (Personel Loan) अशा सर्व प्रकारच्या कर्जांवर होतो.

रेपो रेट (Repo Rate) म्हणजे, ज्या दरावर रिझर्व्ह बँक इतर बँकांना कर्ज देते. तर रिव्हर्स रेपो रेट म्हणजे, ज्यावर रिझर्व्ह बँक पैशांच्या ठेवींवर व्याज देते. रेपो रेट कमी झाल्यामुळे कर्जाचा ईएमआय कमी होतो, तर रेपो रेट वाढल्याने सर्व प्रकारची कर्ज महाग होतात आणि या क्रमानं ईएमआयमध्येही वाढ होते. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde on CM: एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
Maharashtra vidhansabha results 2024 : परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
Maharashtra Assembly Election Result : मुहायुतीची बुलेट ट्रेन सुस्साट, महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड, नियम काय सांगतो?
मुहायुतीची बुलेट ट्रेन सुस्साट, महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड, नियम काय सांगतो?
Eknath Shinde : हा विजय लाडक्या बहिणींचे प्रेम, आमच्या कामाची पोचपावती; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
हा विजय लाडक्या बहिणींचे प्रेम, आमच्या कामाची पोचपावती; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024Maharashtra Election Result 2024 :निवडणुकीत कोणते मुद्दे चर्चेत राहिले?Uday Tanpathakयांचं विश्लेषणMaharashtra Election Result 2024:सत्तेचा मार्ग विदर्भातून?जनता ठरवणार खरी शिवसेना, राष्ट्रवादी कोणतीMaharashtra Election Result 2024 : पहिला कल भाजपच्या बाजूने, टपाली मतमोजणी सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde on CM: एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
Maharashtra vidhansabha results 2024 : परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
Maharashtra Assembly Election Result : मुहायुतीची बुलेट ट्रेन सुस्साट, महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड, नियम काय सांगतो?
मुहायुतीची बुलेट ट्रेन सुस्साट, महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड, नियम काय सांगतो?
Eknath Shinde : हा विजय लाडक्या बहिणींचे प्रेम, आमच्या कामाची पोचपावती; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
हा विजय लाडक्या बहिणींचे प्रेम, आमच्या कामाची पोचपावती; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
Vidhan Sabha Election Results 2024 : महाराष्ट्राचे नवे आमदार, सर्व विजयी उमेदवारांची यादी, पाहा
महाराष्ट्राचे नवे आमदार, सर्व विजयी उमेदवारांची यादी, पाहा
Maharashtra vidhansabha Results 2024 देवाभाऊंचं यश पाहून सख्खा भाऊ पहिल्यांदाच टीव्हीवर; आशिष फडणवीस मुख्यमंत्रीपदाबाबत स्पष्टच म्हणाले....
देवाभाऊंचं यश पाहून सख्खा भाऊ पहिल्यांदाच टीव्हीवर; आशिष फडणवीस मुख्यमंत्रीपदाबाबत स्पष्टच म्हणाले....
Mahad Assembly Election results : ठाकरेंच्या पहिल्या उमेदवाराकडून पराभव मान्य, भरतशेठ गोगावलेंचा विजय जवळपास निश्चित
ठाकरेंच्या पहिल्या उमेदवाराकडून पराभव मान्य, भरतशेठ गोगावलेंचा विजय जवळपास निश्चित
Eknath Shinde vs Uddhav Thackeray: अबतक 56! खरी शिवसेना कोणाची, फैसला झाला? ठाकरेंना धक्का, एकनाथ शिंदेंना घवघवीत यश
अबतक 56! खरी शिवसेना कोणाची, फैसला झाला? ठाकरेंना धक्का, एकनाथ शिंदेंना घवघवीत यश
Embed widget