आईचं दूध कोण प्यायलंय याचा निर्णय श्रीनगरच्या लाल चौकात होईल, तिरंग्याच्या मुद्द्यावरुन नरेंद्र मोदींचं दहशतवाद्यांना आव्हान- संसदेत सांगितला किस्सा
PM Narendra Modi Speech: आईचं दूध प्यायला असाल तर श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवून दाखवा, असं आव्हान दहशतवाद्यांनी नरेंद्र मोदी यांना दिलं होतं. त्यावर मोदी यांनी प्रतिआव्हान देत तिरंगा फडकवला.
PM Narendra Modi Parliament Speech: आईचं दूध प्यायला असाल तर श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा फडकवून दाखवा असं आव्हान दहशतवाद्यांनी दिल्यानंतर ते मी स्वीकारलं आणि एकट्याने जाऊन तिरंगा फडकावला असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत सांगितलं. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर ते संसदेत बोलत होते.
नरेंद्र मोदी यांनी आज संसदेत बोलताना एक जुना किस्सा सांगितला. ते म्हणाले की, "श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकण्याचा संकल्प करुन मी जम्मू काश्मिरमध्ये यात्रा घेऊन गेलो होतो. त्यावेळी 'पाहूयात, कोण आपल्या आईचं दूध प्यायलंय, जो लाल चौकात येऊन तिरंगा फडकवतोय ' अशा आशयाचं पोस्टर्स दहशतवाद्यांनी लावले होते. त्यावेळी मी जम्मू काश्मीरमधील भरसभेत सांगितलं होतं, 26 जानेवारीला सकाळी 11 वाजता मी श्रीनगरमधील लाल चौकात पोहोचतोय. विना बुलेटफ्रुफ जाकेट आणि सुरक्षा रक्षाकांशिवाय येतो. कोण आपल्या आईचं दूध प्यायलंय याचा निर्णय लाल चौकात होईल."
नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवला. त्यावेळी माध्यमांनी मला सांगितलं की 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला तिरंगा फडकावला जातो त्यावेळी तोफांच्या सलामी दिल्या जातात, आज त्यातलं काहीच झालं नाही. त्यावर मी म्हणालो की, मी लाल चौकात तिरंगा फडकावला त्यावेळी पाकिस्तानच्या तोफांनीही मला सलामी दिली, गोळ्या चालवल्या गेल्या.
आज जम्मू काश्मीरला न घाबरता जाता येतं ते आमच्या सरकारमुळे, आज जम्मू काश्मीरमध्ये खऱ्या अर्थाने लोकशाही कार्यरत आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत सांगितलं. ते म्हणाले की, आज जम्मू काश्मीरमध्ये हर घर तिरंगा कार्यक्रम साजरा झाला. काही लोक म्हणायचं की या ठिकाणी तिरंगा लावला तर शांतता नष्ट होईल. पण आज तेच लोक तिरंगा यात्रेत सामील झाले. आज जम्मू काश्मीरमध्ये कोणीही पर्यटनासाठी न घाबरता जाऊ शकतो, तिथला आनंद घेऊ शकतो.
दुष्यंत कुमार यांच्या कवितेतून काँग्रेसवर टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक संदर्भ देत काँग्रेसवर टीका केली. 'तुम्हारे पांव के नीचे कोई जमीन नहीं... कमाल ये है की फिरभी तुम्हे यकीन नही' या दुष्यंत कुमार यांच्या कवितेचा संदर्भ देत पंतप्रधानांनी काँग्रेसवर टीका केली.
ही बातमी वाचा :