एक्स्प्लोर

बापाने खेळायला मोबाईल दिला, पोरानं मात्र 'गेमच' केला; 6 वर्षाच्या मुलानं दिली तब्बल 80 हजार रुपयांच्या जेवणाची ऑर्डर, सोबत 25 टक्के टीपही

ऑर्डर देऊन मुलगा झोपायला गेला आणि त्याच्या घरासमोर फूड डिलिव्हरी कंपन्यांच्या गाड्यांची रांग लागली. मात्र त्या मुलाच्या वडिलांना याची काहीही कल्पना नव्हती. 

Viral News: समस्या कोणतीही असो, त्यावरील उपाय हा मोबाईलच्या माध्यमातून मिळतोच. खाण्या-पिण्याच्या गोष्टी असो वा रेल्वेचं तिकीट असो, किंवा कुणाला पैसे ट्रान्सफर करणं असो, मोबाईलवरुन या सर्व गोष्टी सहज साध्य आहेत आणि त्यामुळे आपलं जीवनही सुलभ होतंय. एवढंच नाही तर आजकाल लहान मुलेही मोबाईल वापरायला लागली आहेत. जेव्हा ती रडतात तेव्हा पालक रडणाऱ्या मुलाला शांत करण्यासाठी त्याच्या हातात मोबाईल देतात. मात्र त्याचेही अनेक तोटे आहेत. काही वेळा मोबाईल मुलांच्या हाती दिल्यास त्याचा आर्थिक फटका पालकांना बसतोय. अशाच एका घटनेत एका मुलाने त्याच्या वडिलांचा मोबाईल घेतला आणि त्यावरुन तब्बल 80 हजार रुपयांच्या जेवणाची ऑर्डर दिली. इतकचं काय तर वरुन त्याने 25 टक्के टीपही दिली. 

गेम खेळायला मोबाईल दिला आणि... 

गार्डियनने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेतील मिशिगनमध्ये राहणाऱ्या 6 वर्षांच्या मुलाला भूक लागली होती. त्यानंतर त्याने वडिलांच्या मोबाइलवरून 1000 डॉलर्स म्हणजे सुमारे 80 हजार रुपयाच्या जेवणाची ऑर्डर केले. या मुलाच्या वडिलाचे नाव  कीथ स्टोनहाउस असून त्याने आपल्या मुलाला मोबाईल गेम खेळायला दिला होता, आणि तेवढ्यात या मुलाने हा 'खेळ' केला.

कीथ स्टोनहाऊसने सांगितले की, तो आपल्या मुलाला झोपवत होता. तेवढ्यात घराबाहेर गाडी थांबल्याचा त्याला आवाज आला. कीथला वाटले की त्याच्या पत्नीने काहीतरी ऑर्डर केलं आहे. मात्र पुढच्या काही वेळात अनेक वाहने त्याच्या घरासमोर थांबली. सर्व वाहनांमध्ये जेवणाची ऑर्डर होती. या सर्व ऑर्डर कीथच्या घरातून दिल्या असल्याचं त्याला सांगण्यात आलं. त्यावर कीथने असं काही घडलं नसल्याचं सांगत ऑर्डर घेऊन येणाऱ्यांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. 

प्रत्येकाला 25 टक्के टिपही दिली 

या सर्व वादावादीनंतर कीथने त्याचा फोन चेक केला असता त्याच्या मोबाईलवर तब्बल 80 हजार रुपये कट झाल्याचा मेसेज आला होता. नंतर त्याच्या लक्षात आलं की या सर्व ऑर्डर्स त्याच्या सहा वर्षाच्या मुलाने केल्या आहेत. त्या मुलाने वेगवेगळ्या रेस्टॉरंटमधून ऑर्डर केली होती. एवढंच नाही तर प्रत्येकाला 25 टक्के टिपही दिली होती.

हे मेन्यू केले ऑर्डर 

फूड डिलिव्हरी ऑर्डरमध्ये पिझ्झा, जंबो कोळंबी, चिकन पिटा सँडविच, चिली चीज फ्राईज आणि बरंच काही समाविष्ट होते. कीथ ऑर्डर रद्द करण्याचा मार्ग शोधू शकला नाही. त्यांनं सांगितलं की त्याचा मुलगा सतत काहीतरी उचापती करतो, त्यामुळे या आधीही अशा अनेक घटना घडल्या आहेत. 

मुलं रडायला लागली तर त्यांना शांत बसवण्यासाठी पालक त्यांच्या हातात मोबाईल देतात आणि बिनधास्त होतात. पण मग मुलंही असं काहीतरी करतात की त्यामुळे पालकांच्या अकाउंटवरील पैसे उडतात. 

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

श्री शनि मंदिरातील चौथऱ्यावर भेसळयुक्त तेल; FDA नं नमुने तपासून कारवाई करावी; मंदिर प्रशासनाला निवेदन
श्री शनि मंदिरातील चौथऱ्यावर भेसळयुक्त तेल; FDA नं नमुने तपासून कारवाई करावी; मंदिर प्रशासनाला निवेदन
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Embed widget