Rajinikanth-Hema Malini : रजनीकांत आणि हेमा मालिनी यांचा 'अंधा कानून' ओटीटीवर, 1983 च्या सुपरहीट चित्रपटाचा 2023 मध्ये थरार
Rajinikanth -Hema Malini : 'अंधा कानून' हा चित्रपट 1983 साली प्रदर्शित झाला होता. अंधा कानून या चित्रपटात हेमा मालिनी आणि रजनीकांत एकांच कुटूंबाचा भाग आहेत.
Rajinikanth -Hema Malini : साऊथचा सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) आणि बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी (Hema Malini) यांची एकत्रित भूमिका असलेला 'अंधा कानून' (Andhaa Kaanoon) चित्रपट आता ओटीटीवर (OTT) आलाय. ओटीटीवर आल्यामुळे 1983 ला प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रेषकांना आता पुन्हा पाहता येणार आहे. या चित्रपटात रजनीकांत यांनी हेमा मालिनी यांच्या भावाची भूमिका साकारली होती आणि त्यांना खूप त्रास दिला होता. लाखो चाहते असलेल्या या दोघांचा चित्रपटाने त्यावेळी चित्रपटगृहांमध्ये जोरदार धडाका लावला होता.
1983 ला आलेल्या 'अंधा कानून' या चित्रपटात रजनीकांत आणि हेमा मालिनी यांनी स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटात रजनीकांत यांनी हेमा मालिनी यांच्या भावाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात 'ड्रीम गर्ल' हेमा मालिनी यांना रजनीकांत यांनी खूप त्रास दिला होता. दोघांचाही भारतासह जगभरात मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हा चित्रपट ओटीटीवर देखील चालणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी हा चीत्रपट ओटीटीवर येणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे दोघांच्याही चाहत्यांना चित्रपट पाहण्यासाठी उत्साही होते.
'अंधा कानून' हा चित्रपट 1983 साली प्रदर्शित झाला होता. अंधा कानून या चित्रपटात हेमा मालिनी आणि रजनीकांत एकांच कुटूंबाचा भाग आहेत. या चित्रपटात विलनची संख्या जास्त आहे. रजनीकांत हे बदल्याच्या भावने विलनच्या मागावर जातात आणि विलनचा खात्मा करतात. तर हेमा मालिनी या पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहेत. हेमा मालिनी या रजनीकांत यांच्या मागावर आहेत. पण हेमा मालिनी कधीच रजनीकांत यांना पकडू शकत नाहीत, अशी 'अंधा कानून' या चित्रपटाची कथा आहे. हा चित्रपटाने 1983 चा सुपरहीट चित्रपट ठरला होता. ओटीटीवर आल्यामुळे आता चाहत्यांना दुसऱ्यांदा हा चित्रपट पाहात येणार आहे. शिवाय त्यावेळी ज्यांनी हा चित्रपट पाहिला नव्हता त्यांना देखील आता हा चित्रपट पाहात येणार आहे.
अमिताभ बच्चन गेस्टच्या भूमिकेत
अंधा कानून चित्रपटाचे टाइटल गाणं अमिताभ बच्चन (Rajinikanth) यांच्या गेस्ट एन्ट्रीवर बनवले होते. 'अंधा कानून' या चित्रपटात अमिताभ बच्चन यांची खूप महत्वाची भूमीका होती. रजनीकांत आणि अमिताभ बच्चन यांच्या जोडीचे प्रेषकांनी खूप कौतुक केले होते.
महत्वाच्या बातम्या