पाचवीही मुलगीच झाली, आई-वडिलांनी कट रचला; चौथीची जिभ कापली, पाचवीची हत्या करुन मृतदेह पुरला, मुंब्र्यातील भयावह घटना
Mumbra Crime: दीड वर्षाच्या चिमुरडीचा हत्या 18 मार्च 2024 रोजी घडली तर चिमुरडी लबीबा शेख हिच्या हत्येनंतर दाम्पत्यांनी 19 मार्च रोजी रात्री 2.30 वाजण्याच्या सुमारास मृतदेह पुरला.
Mumbra Crime: दोन मुले आणि तिसऱ्या मुलीनंतरही आणखी दोन मुली झाल्याने 18 महिन्याच्या मुलीची (Mumbra Crime) हत्या केली आणि तिचा मृतदेह पुरला. तर दुसऱ्या मुलीची जीभ कापणाऱ्या आई नुरानी जाहीद शेख (28), वडील जाहीद सलामत शेख (38) याना मुंब्रा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या नराधमांनी पाचवीही मुलगी झाल्याने आणि आजारी असल्याने मुलीची हत्या केल्याची आणि तिचा मृतदेह पुरल्याची कबुली दिली.
दीड वर्षाच्या चिमुरडीचा हत्या 18 मार्च 2024 रोजी घडली तर चिमुरडी लबीबा शेख हिच्या हत्येनंतर दाम्पत्यांनी 19 मार्च रोजी रात्री 2.30 वाजण्याच्या सुमारास मृतदेह पुरला. मात्र 4 एप्रिल रोजी संतोष महादेव या बनावट नावाने प्राप्त झालेल्या अर्जमुळे खुनाचा गुन्हा उघडकीस आला. अटक दाम्पत्याना न्यायालयात नेले असता 18 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले.
मुलीची हत्या अन् मृतदेह पुरला
मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीती घडलेला हत्येचा गुन्हा लपविण्यासाठी मृतदेह पुरून मोकळे झालेल्या नराधम दाम्पत्याला बनावट नावाने केलेल्या अर्जाची दाखल मुंब्रा पोलिसांनी घेत खुनी आई-वडिलांना कौशल्यपूर्ण तपासात जाळ्यात अडकविले. सदरचा हत्येचा गुन्हा हा आई नुरानी नाहीद शेख (28) आणि वडील जाहीद सलामत शेख (38 ) यांनी मोठ्या शिताफीने करून मृतदेह पुरला. मृतक लबीबा हिच्या डोक्यावर आणि डोक्याच्या मागे गंभीर जखम करत हत्या केली. मयत चिमुरडी लबीबा ही आरोपी दाम्पत्याची पाचवी मुलगी होती. मेडफॉर्ड हॉस्पिटल व अलमास हॉस्पिटलमध्ये या दाम्पत्याने जखमांचे कारणे दाखवून वेळ मारून नेली. मात्र रक्तस्त्राव झाल्याने लबीबा हीच मृत्यू 18 मार्च रोजी झाला. तर 19 मार्चला मृतदेह कौसा कब्रस्तान येथे पुरला. त्यानंतर मुंब्रा पोलिसांना निनावी प्राप्त अर्जाद्वारे संशय व्यक्त केल्याने पोलिसांनी वैद्यकीय अवहाल तपासले त्यात विसंगती आढळली. तर चुकीची माहिती देत दाम्पत्यांनी मृत्यू दाखलाही मिळवला.
दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल
मुंब्रा पोलिसांनी तपस करत संशयावरून आई नूरानी आणि वडील जाहिद यांची कसून चौकशी केली. अन सत्य बाहेर पडले. मुंब्रा पोलिसांनी दाम्पत्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून आरोपीना अटक केली. शेवटच्या झालेल्या दोन मुली हबीब आणि लबीबा दाम्पत्याला नको होत्या. यापूर्वी हबीबा हिची जीभ कापल्याप्रकरणी झारखंड राज्यात या दाम्पत्यावर गुन्हा दाखल असलायची माहिती पोलिसांनी दिली. सदरच्या घटनेनंतर 28 दिवसात खून पचल्याचा आनंद दाम्पत्याला झाला. मात्र याच दरम्यान मुंब्रा पोलिसांना बनावट नावाने अर्जदार संतोष हरिलाल महादेव नावाने प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेत पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरु केली. अन् आरोपी गालाला लागले. त्यांना न्यायालयात नेले असता 18 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली.
हे ही वाचा :