Anjali Damania Full PC : बीडमध्ये दादागिरी आणि जमिनी लाटण्याचं काम, अंजली दमानियांचा मुंडेंवर वार
मुंबई : धनंजय मुंडे यांनी जर कृषी खात्याचे मंत्री म्हणून काम केलं असतं तर त्यांना खात्यात काय सुरू आहे याची माहिती असती. पण त्यांनी बीडमध्ये दादागिरी आणि जमिनी लाटण्याचं काम केलं. त्यांनी त्यांच्या मामींच्या जमीनही लाटली असल्याचा जोरदार टोला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी लगावला. धनंजय मुंडे यांनी भ्रष्टाचार केला याचा पुनरूच्चारही दमानिया यांनी केला. आपण बदनाम लोकांच्या विरोधात पुरावे देत असल्याने काहीही म्हणा असंही त्या म्हणाल्या. धनंजय मुंडे यांनी अंजली दमानिया यांनी केलेले आरोप फेटाळले होते आणि त्यांना बदनामिया असं म्हटलं होतं. त्याला दमानिया यांनी प्रत्युत्तर दिलं.
अंजली दमानिया यांनी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या टीकेला मुंडे यांनी प्रत्युत्तर दिले होते. आपल्यावरील सर्व आरोप फेटाळत त्यांनी दमानिया यांना बदनामिया असं म्हटलं होतं. दमानियांनी केलेले आरोप केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी असल्याचं मुंडेंनी म्हटलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना अंजली दमानिया म्हणाल्या की, मी धनंजय मुंडे यांची जागा दाखवली. त्यांनी मला बदनामिया म्हटलं, पण त्यांनी मला पुराविया म्हटलं पाहिजे होतं.
मंत्री म्हणून काम केलं असतं तर...
मुंडेंनी घोटाळा केल्याचा अंजली दमानिया यांनी पुनरुच्चार केला. त्यावेळी कृषी आयुक्तांच्या अहवालाचा अंजली दमानिया याच्याकडून दाखला देण्यात आला. त्या म्हणाल्या की, मंत्री म्हणून धनंजय मुंडे यांनी जर वेळ दिला असता तर त्यांना सगळं कळलं असतं. पण यांनी बीडमध्ये जाऊन द
महत्त्वाच्या बातम्या




















