एक्स्प्लोर

रिक्षावर झाड कोसळून 'मुंबईचा डबेवाला' ठार, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; संघटनेचं मुख्यमंत्र्यांना पत्र

कल्याण परिसरात अवकाळी  पाऊस आणि वारा होता. रस्त्याच्या कडेला उभे असलेले एक मोठे गुलमोहराचे झाड चालत्या रिक्षावर कोसळले.

मुंबई : राजधानी मुंबईत आजही अवकाळी पावसामुळे (Rain) सर्वत्र प्रवाशांची दाणादाण उडाली आहे. तर, काही भागात वादळी वाऱ्याने झाडे उन्मळून पडली आहेत. कल्याण पूर्वेतील चिंचपाडा रोडवर गुलमोहराचे झाड चालत्या रिक्षावर कोसळल्याने रिक्षा चालकासह दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली होती. या दुर्घटनेत मुंबईच्या डबेवाल्याचा (Mumbai) मृत्यू झाला आहे. या अपघाताने डबेवाला असलेल्या खेंगळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे, डबेवाला संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतनिधीची मागणी केली आहे.

कल्याण परिसरात अवकाळी  पाऊस आणि वारा होता. रस्त्याच्या कडेला उभे असलेले एक मोठे गुलमोहराचे झाड चालत्या रिक्षावर कोसळले. या अपघात रिक्षाचालकासह तिघांचा मृत्यू झाला. जखमींना कल्याणमधील बाई रुक्मिणीबाई रुग्णालयात नेले, पण तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. मृतांमध्ये रिक्षा चालक - उमा शंकर वर्मा वय अंदाजे 45 रा. मातोश्री नगर चिंचपाडा गाव, तुकाराम खेंगळे वय 50 रा. चिंचपाडा गाव आणि लता दत्ताराम राऊत वय 47 रा. साई समृद्धी चाळ रूम नंबर 5 चिंचपाडा गाव अशी मृतांची नावे आहेत. मृतांमध्ये  तुकाराम खेंगळे या मुंबईच्या डबेवाल्याचा समावेश आहे 

मंगळवारी रात्री मुंबई-ठाणे-कल्याण परिसरात वादळवाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. या वादळवाऱ्यात चिंचपाडा कल्याण येथे रिक्षावर झाड कोसळून तुकाराम खेंगले या डबेवाला कामगाराचे अपघाती निधन झाले. त्यांच्यावर त्यांचे मुळ गाव पुणे जिल्ह्यातील पाईट ता. राजगुरूनगर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
तुकाराम खेंगळे अनेक वर्ष मुंबईत डबे पोहचवण्याचे काम करत होते. दिवसभर मुंबईत डबे पोहचवणाचे काम संपवून ते कल्याण पूर्वेतील रेल्वे स्टेशनवरून रिक्षाने घरी जात असताना चालत्या रिक्षाने गुलमोहराचे झाड कोसळले आणी त्यांचे त्याच अपघाती निधन झाले.

मुख्यमंत्र्यांकडे मदतीची मागणी

तुकाराम खेंगळे हे घरामधील कमावता व्यक्ती होते, त्यांचे अपघाती निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता कक्षामधूनन आर्थिक मदत मिळण्यासाठी “मुंबई डबेवाला असोशिएशन”ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही डबेवाला संघटनेनं खेंगळे कुटुंबीयांसाठी मदतीची हाक दिली आहे. 

हेही वाचा

मुंबईत अवकाळीच्या सरी, रस्त्यावर पाणी, लोकल खोळंबा; चाकरमान्यांना वेट अँड वॉच

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Commercial LPG Crisis : गॅस तुटवड्यामुळे भिवंडीतील ढाबा-हॉटेल व्यवसाय अडचणीत; चुली पेटवून सुरू ठेवला व्यवसाय
गॅस तुटवड्यामुळे भिवंडीतील ढाबा-हॉटेल व्यवसाय अडचणीत; चुली पेटवून सुरू ठेवला व्यवसाय
Kalyan : दोन एकरचा करार, पण साडेसात एकर हडपले, कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा शिक्षण संस्थेवर आरोप
दोन एकरचा करार, पण साडेसात एकर हडपले, कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा शिक्षण संस्थेवर आरोप
धक्कादायक! तब्बल सव्वाचार कोटींचं ड्रग्स जप्त, दोन जणांना अटक, अंबरनाथ पोलिसांची कारवाई  
धक्कादायक! तब्बल सव्वाचार कोटींचं ड्रग्स जप्त, दोन जणांना अटक, अंबरनाथ पोलिसांची कारवाई  
Gas Shortage Thane: मोठी बातमी: गॅस टंचाईमुळे तळीरामांचा घसा कोरडा राहणार, ठाण्यातील 80 टक्के बार, हॉटेल्स चार दिवसात बंद होणार?
मोठी बातमी: गॅस टंचाईमुळे तळीरामांचा घसा कोरडा राहणार, ठाण्यातील 80 टक्के बार, हॉटेल्स चार दिवसात बंद होणार?

व्हिडीओ

Vidhan Bhavan Bomb Threat विधान भवनात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ईमेल,बॉम्बशोधक पथक, श्वान पथकाकडून तपास
Iran Israel Effect : गॅसटंचाईचं कारण, भडकलं राजकारण, युद्धावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये लढाई Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : युद्धाचं फलित, गॅस गेला चुलीत! Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : अफवांचा भडका,भीतीची रांग, बुकिंगसाठी गर्दी Special Report
Danve Vs Bamb : काल पकडली कॉलर, आज सत्तेचा पदर Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'नरेंदर भी गायब, सिलेंडर भी गायब..' संसदेच्या प्रांगणात विरोधकांचा हल्लाबोल; राहुल गांधी म्हणाले, गॅस टंचाई ही फक्त सुरुवात, एपस्टीनचं नाव घेताच सभापतींनी बोलण्यापासून पुन्हा रोखलं
'नरेंदर भी गायब, सिलेंडर भी गायब..' संसदेच्या प्रांगणात विरोधकांचा हल्लाबोल; राहुल गांधी म्हणाले, गॅस टंचाई ही फक्त सुरुवात, एपस्टीनचं नाव घेताच सभापतींनी बोलण्यापासून पुन्हा रोखलं
रोहित पवारांचा प्रफुल पटेलांवर पुन्हा निशाणा, म्हणाले, जय पवारवरही दबाव; भेटीनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
रोहित पवारांचा प्रफुल पटेलांवर पुन्हा निशाणा, म्हणाले, जय पवारवरही दबाव; भेटीनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
Ashneer Grover On LPG: 'टंचाई नक्कीच खरी असली पाहिजे! विरोधाभास बघा, श्री रामाकडेही सिलिंडर नाही' अशनीश ग्रोव्हरची देशातील इंधन टंचाईवर खोचक टिप्पणी
'टंचाई नक्कीच खरी असली पाहिजे! विरोधाभास बघा, श्री रामाकडेही सिलिंडर नाही' अशनीश ग्रोव्हरची देशातील इंधन टंचाईवर खोचक टिप्पणी
OBC Reservation : फक्त पालकांच्या उत्पन्नावरून OBC क्रीमी लेयर ठरवता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
फक्त पालकांच्या उत्पन्नावरून OBC क्रीमी लेयर ठरवता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
Iran War Live Update: सैन्याची बिनशर्त शरणागती सोडाच, इराणमध्ये नेतृत्व संपवून सत्तापालट सुद्धा शक्य नाही! ट्रम्प युद्ध गुंडाळण्याच्या तयारीत
सैन्याची बिनशर्त शरणागती सोडाच, इराणमध्ये नेतृत्व संपवून सत्तापालट सुद्धा शक्य नाही! ट्रम्प युद्ध गुंडाळण्याच्या तयारीत
Shivsena : शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं? दोन्ही गट अंतिम युक्तिवादासाठी तयार, पण कोर्टाकडून पुन्हा पुढची तारीख
शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं? दोन्ही गट अंतिम युक्तिवादासाठी तयार, पण कोर्टाकडून पुन्हा पुढची तारीख
उन्हाचा कडाका वाढला, शाळेची वेळ बदलली; ZP सीईओंनी काढला आदेश, सकाळच्या सत्रात वाजणार घंटा
उन्हाचा कडाका वाढला, शाळेची वेळ बदलली; ZP सीईओंनी काढला आदेश, सकाळच्या सत्रात वाजणार घंटा
सोलापुरात भाजपचा जल्लोष, 11 पैकी 10 पंचायत समितीवर सभापती; शहाजी बापूंच्या सांगोल्यात ऐनवेळी गेम पलटला
सोलापुरात भाजपचा जल्लोष, 11 पैकी 10 पंचायत समितीवर सभापती; शहाजी बापूंच्या सांगोल्यात ऐनवेळी गेम पलटला
Embed widget