एक्स्प्लोर

Mahesh Gaikwad : मोठी बातमी! महेश गायकवाड यांना मिळाला डिस्चार्ज, स्वागतासाठी कार्यकर्त्यांकडून जोरदार तयारी

Mahesh Gaikwad : भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारात महेश गायकवाड जखमी झाले होते. आज त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्वागतासाठी जोरदार तयारी केली आहे.

Mahesh Gaikwad : शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांना आज डिस्चार्ज मिळाला आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad firing) यांनी केलेल्या गोळीबारात महेश गायकवाड जखमी झाले होते. त्यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरु होते. आज तब्बल 24 दिवसानंतर महेश गायकवाड यांना डिस्चार्ज मिळाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.  

उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यात गणपत गायकवाड यांनी शुक्रवार 2 फेब्रुवारी रोजी महेश गायकवाड आणि सहकारी राहुल पाटील (Rahul Patil) यांच्यावर जमिनीच्या वादावरून एकूण १० गोळ्या झाडल्या होत्या. त्यापैकी महेश गायकवाड यांच्यावर सहा गोळ्या तर राहुल पाटील यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या होत्या. त्यामुळे दोघांना तातडीने उपचारासाठी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात (Jupiter Hospital) हलविण्यात आले होते. दरम्यान आज त्यांना डिस्चार्ज (Discharge) मिळाला.  महेश गायकवाड यांच्या स्वागतासाठी समर्थकांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. शहरात जागोजागी बॅनर लावण्यात आले आहेत.  

पोलीस बंदोबस्त तैनात

महेश गायकवाड यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर चात्यांकडून मोठ्या संख्येने ठाणे आणि कल्याण-डोंबिवली या ठिकाणाहून बॅनरबाजी तसेच शक्ती प्रदर्शन होण्याची शक्यता असल्याने कायदा सुव्यवस्था बघता मोठा पोलीस (Police) बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.

गणपत गायकवाडांसह पाच जणांना न्यायालयीन कोठडी

या गोळीबार प्रकरणात गणपत गायकवाडसह पाच जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी उल्हासनगर चोपडा कोर्टाकडून देण्यात आलेली आहे. सध्या सर्व आरोपींना सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तळोजा कारागृहात (Jail) हलविण्यात आले आहे. या प्रकरणामुळे येणाऱ्या काळात कल्याण-डोंबिवली मतदार संघात शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप (BJP) असा आमना सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे. 

महेश गायकवाडांची आज पत्रकार परिषद

महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) आणि राहुल पाटील यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्यासह इतर नेते मंडळींनी उपचारादरम्यान भेट घेतली होती. आज संध्याकाळी सहा वाजता महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेचे (Press Conference) आयोजन करण्यात आले आहे. महेश गायकवाड हे आज काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

पुणे, कोल्हापूर ते संभाजीनगर, बुलढाणा, राज ठाकरेंच्या मनसेकडून 21 मतदारसंघाचा आढावा, कुठे कुठे उमेदवार देणार?

'फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी जरांगेंना 100 जन्म घ्यावे लागतील'; नितेश राणेंचा पलटवार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  6:30 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
Embed widget