एक्स्प्लोर

'फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी जरांगेंना 100 जन्म घ्यावे लागतील'; नितेश राणेंचा पलटवार

Nitesh Rane : मनोज जरांगे पाटील यांची नार्को टेस्ट करा, फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी 100 जन्म घ्यावे लागतील, असा पलटवार आमदार नितेश राणे यांनी केला आहे.

Nitesh Rane on Manoj Jarange Patil : रविवारी मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केले. सलाईनमधून विष देण्याचा आणि माझं एन्काऊंटर करण्याचा फडणवीसांचा डाव होता, असे त्यांनी म्हटले. यावरून भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मनोज जरांगे पाटील यांची नार्को टेस्ट करा, असे म्हटले आहे. तसेच फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी 100 जन्म घ्यावे लागतील, असा पलटवर देखील केला आहे.

नितेश राणे म्हणाले की, पहिल्या दिवसापासून आम्ही भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही समाजाच्या प्रश्नावर एक आहोत. आजवर असंख्य लोक, मराठा क्रांती मोर्चा, छत्रपती यांनी भूमिका घेत आंदोलन केलेले आहे. एक व्यक्ती म्हणजे सरकार नाही. सगेसोयरेबाबत लवकरच निर्णय होईल. मनोज जरांगे पाटलांचे सहकारी गंभीर आरोप करत आहेत. त्यांनी जरांगे शरद पवार गट आणि स्थानिक आमदारांच्या जवळ असल्याचे म्हटले आहे. मनोज जरांगे पाटील यांची नार्को टेस्ट करा, असे त्यांनी म्हटले आहे. 

मग हा आवाज तुतारीचा आहे का?

सागरला येणे लांबची गोष्ट आहे. आधी आमची भिंत आहे ती पार करणे अवघड आहे. एक व्यक्ती मराठा समाजाची बदनामी करत असेल तर खपवून घेणार नाही. देवेंद्र फडणवीस हेच मराठा समाजाची बाजू लावून धरणार आहेत. फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी 100 जन्म घ्यावे लागतील. कुणी विनाकारण केसेस अंगावर घेऊ नयेत. जरांगेंचे जुने सहकारी पवारांशी जवळीक असल्याचे त्यांचे सहकारी सांगतात. मग हा आवाज तुतारीचा आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. 

नितेश राणेंचा संजय राऊतांना टोला

संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरही नितेश राणे यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, रात्रीची उतरली असेल तर तुम्ही कालपासून कुणाला फोन करताय हे बाहेर येईल. सिल्व्हर ओक, जरांगे पाटील यांच्या जवळच्या लोकांना बोलत असतील याचा सिडीआर कधीतरी बाहेर येईल. जी भाषा पवार, उद्धव ठाकरे बोलतात तीच भाषा जरांगे बोलत आहेत. आम्ही राजकीय आंदोलनाला समर्थन देणार नाही. आम्हाला धमकी देणाऱ्याचे नंबर आमच्याकडे आहेत, आज ना उद्या पोलीस जेव्हा येतील तेव्हा तुम्हाला कुणी वाचवणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

आणखी वाचा 

'सध्या दोन नाटकांची जुळवाजुळवी करण्याचं काम सुरु'; जरांगेंच्या आंदोलनावर छगन भुजबळांचं सूचक वक्तव्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget