(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कल्याण स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडीवर केडीएमसीचा मेगा प्लॅन, लांब पल्ल्यांच्या एसटी बसला बंदी
Kalyan: मुरबाड, शहापूर कडून येणाऱ्या काळ्या पिवळ्या टक्सीना देखील स्टेशन परिसरात प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
Kalyan Latest Marathi News update: कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत महापालिकेने त्या ठिकाणी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून स्टेशन परिसर विकासकामासह उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात एसटी डेपो असल्याने एसटी बससह एन.एम.टी, के डी एम टी च्या बसेस, रिक्षा टॅक्सी येत जात असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. तसेच उड्डाण पुलाचे काम देखील करताना अडथळे येत होते. या परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी तसेच या कामाचा वेग वाढविण्यासाठी पुढील चार महिन्याच्या कालावधीत कल्याण स्टेशन परिसरात शहराबाहेरून येणाऱ्या आणि शहराबाहेर जाणार्या लांब पल्ल्याच्या एसटी बसेसना स्टेशन परिसरात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. या आदेशाची अंमलबजावणी येत्या सोमवार पासून सुरू होणार असल्याची माहिती कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी दिली. तर मुरबाड, शहापूर कडून येणाऱ्या काळ्या पिवळ्या टक्सीना देखील स्टेशन परिसरात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी या बसेसना गुरुदेव चौकात थांबा देण्यात आला आहे. तसेच लांब पल्ल्याच्या एस्टी गाड्या , शहरा बाहेर जाणाऱ्या केडीएमटी बसेस त्याचप्रमाणे एनएमटीच्या बसेसना पुढील चार महिन्यासाठी दुर्गाडी तसेच गणेश घाट परिसरात थांबा देण्यात आला आहे
कल्याण स्टेशन परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी आज पालिका मुख्यालयात आरटीओ, वाहतूक पोलीस, एसटी व्यवस्थापक, महापालिका अधिकारी, स्मार्ट सिटीचे अधिकारी, ठेकेदार, रिक्षा युनियन यांच्याबरोबर बैठक घेण्यात आली .या बैठकीत पुढील ४ महिन्याच्या कालावधीत कल्याण स्टेशन परिसरात शहरा बाहेरून येणाऱ्या आणि शहरा बाहेर जाणार्या एसटी बसेस, केडीएमटी आणि एनएमएमटीच्या बसेसना तसेच काळी पिवळी टक्सीला स्टेशन परिसरात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. सोमवार पासून या आदेशाची अमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती आज पालिका आयुक्त डॉ भाऊसाहेब दांगडे यांनी दिली.
लांब पल्ल्याच्या एसटी ,केडीएमटी, एनएमएमटीच्या बसेस आणि काळ्या पिवळ्या टक्सीना स्टेशन परिसरात प्रवेश बंद राहणार असून त्यानाही दुर्गाडी आणि गणेश घाट परिसरात थांबा उपलब्ध करून दिला जाणार आहे. प्रवाशाच्या सोयीसाठी दुर्गाडी आणि गणेश घाट परिसरातून स्टेशनकडे येणाऱ्या मिनीबसेस उपलब्ध करून दिल्या जातील तर एसटी प्रशासनाने देखील शहरात या कालावधीत मिनिबसेस चालवाव्यात अशा सूचना त्यांना देण्यात आल्या.स्टेशन परिसरात अस्ताव्यस्त पसरलेल्या रिक्षावर आळा घालत त्यांना फक्त शेअर आणि मीटर अशा दोनच मार्गिका उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना वाहतूक पोलिसांना आयुक्तांनी दिल्या आहेत.