काँग्रेसचे दिग्गज वकील अतिरेक्याची केस घेतात, 1993 बॉम्बस्फोटात अभिनेत्याला वाचवलं; निकम कडाडले
पॉक्सो कायद्याअंतर्गत अधिनियम करावे लागतील, शक्ति विधेयकाचंही कायद्यात रूपांतर झालं पाहिजे अशी अपेक्षा विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केलीय
मुंबई : विजय वडेट्टीवारांची (Vijay Wadettiwar) टीका उज्ज्वल निकमांनी खोडून काढली आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी अतिरेक्यांची वकीलपत्रं घेतलेली आहेत. 1993 च्या बॉम्बस्फोट प्रकरणात एका अभिनेत्याला वाचवण्याचा देखील प्रयत्न झाला आहे, माझ्याकडे आणखीही बरीच माहिती आहे असा पलटवार निकम यांनी केला. ते एबीपी माझाशी बोलत होते.
दरम्यान पॉक्सो कायद्याअंतर्गत अधिनियम करावे लागतील, शक्ति विधेयकाचंही कायद्यात रूपांतर झालं पाहिजे अशी अपेक्षा विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केलीय. विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याकडे केस देण्यामागे कारण काय असा प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या या टिकेला उज्ज्वल निकम यांनी उत्तर दिले.
काहीजण बेताल आणि बेछूट आरोप करण्यासाठी प्रसिद्ध : उज्ज्वल निकम
उज्ज्वल निकम म्हणाले, विरोधी पक्ष नेत्यांना किती काळजी हे दिसत आहे. जिभेला हाड नसते असे म्हणतात पण तरी देखील काहीजण बेताल आणि बेछूट आरोप करण्यासाठी प्रसिद्ध आहेत . करकरे यांचा मृत्यू कसाब यांच्या गोळीबारात झाला असे न्यायलयाने सांगून देखील हेच म्हणाले की मृत्यू गोळीबारात झाला नव्हता. त्यावेळी यांचा पक्ष म्हणाला होता की ती आमची भूमिका नाही.
माझ्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत : उज्ज्वल निकम
मी राजकीय पक्षाकडून निवडणूक लढलो. त्यांच्या पक्षाचे दिग्गज वकील अतिरेक्यांचे वकील होतात . 1993 चा खटला मी चालवत होतो. तेव्हा त्यांच्या पक्षाचे नेते किती आटापिटा करत होते. कोणत्या अभिनेत्याला वाचवण्याचा प्रयत्न त्यावेळी होत होता. माझ्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत, असेही उज्ज्वल निकम म्हणाले.
विरोधकांची टीका
बदलापूरप्रकरणी उज्वल निकमांच्या वकील म्हणून नेमणुकीला विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवारांनी आक्षेप घेतलाय. शिक्षण संस्था आणि वकील एकाच पक्षाशी संबंधित असल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केलाय.. तर एसआयटी,फास्ट ट्रॅक ही फक्त बोलण्याची भाषा.. उज्जवल निकम हे भाजपचेच आहेत ते आता वकील राहिलेले नाहीत. अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.
Ujjwal Nikam On Badlapur Crime : काँग्रेसमधील वकिलांनी अतिरेक्यांचं वकीलपत्र घेतलंय; निकमांची टीका
हे ही वाचा :
Badlapur School: पोलिसांची नेत्रदीपक कामगिरी, पीडित चिमुकलीसोबत गर्भवती आईला 12 तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवलं: जितेंद्र आव्हाड