एक्स्प्लोर
'ठाकरे सरकार'ची परीक्षा आज, दोन दिवस विधानसभेचे कामकाज, आज बहुमत चाचणी
महाविकास आघाडी सरकारला तीन डिसेंबपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची मुदत देण्यात आली होती. विधानसभेत बहुमत सिद्ध झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. दरम्यान दिलीप वळसे पाटील यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई : शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पदभारही स्वीकारला. मात्र आज उद्धव ठाकरे सरकारची खरी परीक्षा असणार आहे. विधानसभेचे कामकाज उद्यापासून दोन दिवस चालणार आहे. आज, शनिवारी महाविकास आघाडीच्या सरकारची बहुमत चाचणी होणार असून उद्या अध्यक्ष आणि विरोधी पक्ष नेत्यांची निवड होणार आहे. महाविकास आघाडी सरकारला तीन डिसेंबपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची मुदत देण्यात आली होती. विधानसभेत बहुमत सिद्ध झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. दरम्यान दिलीप वळसे पाटील यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बहुमत चाचणी पार पडणार आहे. शनिवारी दुपारी 2 वाजता कामकाज सुरु झाल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात येईल. त्यानंतर मंत्र्यांचा परिचय देण्यात येणार आहे. त्यानंतर मंत्रिमंडळावरील विश्वासदर्शक ठराव मांडण्यात येणार आहे. परवा, रविवारी देखील विधानसभा सुरु राहणार असून या दिवशी अध्यक्षांची निवड होणार आहे. त्यानंतर राज्यपालांचे अभिभाषण सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येणार आहे. विरोधी पक्षनेत्यांची नियुक्ती केली जाणार आहे.
विधानसभा अध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम :
विधानसभा अध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम : - विधानसभा अध्यक्षांची निवड 1 डिसेंबरला सकाळी 11 वाजता
- विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत 30 नोव्हेंबर दुपारी 12 वाजेपर्यंत आहे
- नामनिर्देशन पत्रांची छाननी 30 नोव्हेंबर दुपारी 12 वाजेपर्यंत
- नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची मुदत 1 डिसेंबर सकाळी 10 वाजेपर्यंत
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण























