एक्स्प्लोर
आरे कारशेडला स्थगिती, मेट्रोला नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा
आरेतील वृक्षतोड आणि या कारशेडला शिवसेनेने पहिल्यापासून विरोध केला आहे. आता या कारशेडच्या कामाला स्थगिती देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या सरकारच्या निर्णयाला पहिला दणका दिला आहे. मेट्रोला स्थगिती नाही, पण कारशेडला स्थगिती दिली असल्याचे ठाकरे यावेळी म्हणाले.
मुंबई : मुंबईतील बहुचर्चित आरे कारशेडच्या कामाला अखेर नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली आहे. जोपर्यंत या कामाची चौकशी होऊन पर्यायी मार्ग निघत नाही तोपर्यंत आरेतलं आता एक पानही तोडलं जाणार नाही, असं देखील उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. रातोरात झाडांची कत्तल कधीही मान्य नाही, असेही ते म्हणाले. मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पूर्ण कामाची पाहणी करणार असल्याचे ते म्हणाले. आपले वैभव नष्ट करुन विकास आम्हाला नको आहे, असेही ते म्हणाले.
आरेतील वृक्षतोड आणि या कारशेडला शिवसेनेने पहिल्यापासून विरोध केला आहे. आता या कारशेडच्या कामाला स्थगिती देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या सरकारच्या निर्णयाला पहिला दणका दिला आहे. मेट्रोला स्थगिती नाही, पण कारशेडला स्थगिती दिली असल्याचे ठाकरे यावेळी म्हणाले.
यावेळी ते म्हणाले की, माझ्या जनतेच्या एकाही पैशाची उधळपट्टी होणार नाही याची काळजी माझे अधिकारी घेतील. जनतेने शासनावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आणि महाराष्ट्राला देशात अग्रेसर करण्यासाठी विकासकामे करतांना जनतेचा एकही पैसा वाया जाणार नाही असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले की, जनतेने दिलेल्या करातून विकास कामांसाठी निधी प्राप्त होत असतो. निधीचा योग्यप्रकारे विनियोग करून विकासाला गती देणे आवश्यक आहे. सेवाभावनेने कामे केल्यास जनतेचा विश्वास संपादन करता येईल. ‘सरकार माझे आहे’ अशी विश्वासाची भावना जनतेच्या मनात निर्माण करणे ही सर्वांची जबाबदारी आहे, असे ते म्हणाले.
जनतेने विश्वासाने मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपविली आहे. राज्याला मुंबईत जन्मलेला पहिला मुख्यमंत्री मिळाला असल्याने मुंबईसह राज्याला देशात अग्रेसर करण्याचे स्वप्न घेऊन यापुढे काम करावयाचे आहे. विकास कामांसाठी निधी देताना करदात्याचे उत्पन्नही वाढेल याकडेदेखील लक्ष देणे तेवढेच महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण आणण्यासाठी विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवावा, असे त्यांनी सांगितले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
नाशिक
राजकारण
Advertisement