एक्स्प्लोर
चुकून पाठवलेला मेसेज एडिट करा, व्हॉट्सअॅपचं नवं फीचर
न्यूयॉर्क : आपल्या गर्लफ्रेण्ड किंवा बॉयफ्रेण्डला पाठवायचा रोमँटिक व्हॉट्सअॅप मेसेज तुम्ही चुकून आई-वडिल किंवा कामाच्या ग्रुपवर पाठवला आहे का? तुमची ही चूक भविष्यात कदाचित तितकीशी महागात पडणार नाही. कारण व्हॉट्सअॅपवर लवकरच सेंड केलेला मेसेज एडिट करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
व्हॉट्सअॅपने प्रायोगिक तत्त्वावर रिव्होक आणि एडिट हे फीचर्स अॅड केल्याची माहिती 'वॅबीटाइन्फो' (WABetaInfo) या ट्विटर हँडलने दिली आहे. असे मेसेज बाय डिफॉल्ट डिसेबल केले जातील. याबाबतची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती आहे.
विशेष म्हणजे यूझर्स फक्त नुकतेच (ठराविक कालावधीत) पाठवलेले व्हॉट्सअॅप मेसेजच डिलीट करु शकतील. जुने व्हॉट्सअॅप मेसेज डिलीट करण्याची सुविधा नाही. व्हॉट्सअॅप बीटाच्या अँड्रॉईड 2.17.1.869 व्हर्जनवर हे फीचर उपलब्ध झाल्याचंही या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
गेल्याच महिन्यात व्हॉट्सअॅपने व्हिडिओ कॉलिंग सेवा भारतात सुरु केली आहे. अँड्रॉईड, आयफोन आणि विंडोजवर ही सुविधा उपलब्ध आहे. भारतात 16 कोटी व्हॉट्सअॅप यूझर्स आहेत. दररोज 10 कोटी व्हॉट्सअॅप कॉल्स होत असल्याची माहिती आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement