एक्स्प्लोर
शाओमी रेडमी नोट 4 केवळ 999 रुपयात खरेदी करण्याची संधी
फ्लिपकार्टने शाओमी रेडमी नोट 4 च्या स्टोअरमध्ये या ऑफर्स लिस्ट केल्या आहेत. या ऑफरनुसार रेडमी नोट 4 वर पहिल्यांदाच 12 हजार रुपयांपर्यंतची एक्स्चेंज ऑफर देण्यात आली आहे.
मुंबई : शाओमी रेडमी नोट 4 ची कंपनीकडून प्रत्येक आठवड्याला सेलमध्ये विक्री करण्यात येते. मात्र या फोन लवकर आऊट ऑफ स्टॉक झाल्यामुळे अनेकांना खरेदी करणं शक्य होत नाही. पण 2 ऑगस्टला होणाऱ्या सेलमध्ये या फोनवर अनेक ऑफर्स मिळणार आहेत.
फ्लिपकार्टने शाओमी रेडमी नोट 4 च्या स्टोअरमध्ये या ऑफर्स लिस्ट केल्या आहेत. या ऑफरनुसार रेडमी नोट 4 वर पहिल्यांदाच 12 हजार रुपयांपर्यंतची एक्स्चेंज ऑफर देण्यात आली आहे. म्हणजेच एखाद्या ग्राहकाला या ऑफरचा पूर्ण लाभ मिळाल्यास हा फोन केवळ 999 रुपयांतही खरेदी करता येईल.
फ्लिपकार्ट या फोनसोबत बायबॅक गॅरंटीही देणार आहे, ज्यासाठी 249 रुपये जास्त द्यावे लागतील. 9 हजार 999 रुपये किंमतीच्या 2GB/32GB रॅम व्हेरिएंटची बायबॅक गॅरंटी व्हॅल्यू 4 हजार रुपये, 3GB/32GB रॅम व्हेरिएंटची बायबॅक व्हॅल्यू 4 हजार 500 रुपये आणि 4GB/64GB रॅम व्हेरिएंटची बायबॅक गॅरंटी व्हॅल्यू 5 हजार 200 रुपये ठेवण्यात आली आहे.
शिवाय रेडमी नोट 4 खरेदी केल्यानंतर Mi2 एअर प्युरिफायर खरेदी करताना 500 रुपयांची अतिरिक्त सूट मिळणार आहे. शाओमीच्या या फोनमध्ये लवकरच अँड्रॉईड नॉगट अपडेटही मिळणार असल्याची माहिती आहे.
शाओमी रेडमी नोट 4 ला 5.5 इंच आकाराची स्क्रीन देण्यात आली आहे. तर यामध्ये 625 स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आहे. 2GB/32GB, 3GB/32GB आणि 4GB/64GB अशा तीन व्हेरिएंटमध्ये हा फोन उपलब्ध आहे. 4100mAh क्षमतेची बॅटरी, 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा असे फीचर्स या फोनमध्ये आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नागपूर
महाराष्ट्र
बीड
Advertisement