एक्स्प्लोर
शाओमीच्या स्मार्ट टीव्हीचं 7 मार्चला लाँचिंग
शाओमीने काही दिवसांपूर्वीच जगातील सर्वात स्लिम स्मार्ट एलईडी टीव्ही (55 इंच) लाँच केला होता. आता याच सीरीजमधील नवा स्मार्ट टीव्ही शाओमी 7 मार्चला लाँच करणार आहे.
मुंबई : शाओमीने काही दिवसांपूर्वीच जगातील सर्वात स्लिम स्मार्ट एलईडी टीव्ही (55 इंच) लाँच केला होता. आता याच सीरीजमधील नवा स्मार्ट टीव्ही शाओमी 7 मार्चला लाँच करणार आहे.
यासाठी शाओमीने एक इव्हेंट पेजही सुरु केलं आहे. पण या इव्हेंट पेजवरही टीव्ही मॉडेल्सबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. या लाँच इव्हेंटचं लाईव्ह स्ट्रीमिंग 7 मार्चला दुपारी 3 वाजेपासून होणार आहे. लाँचिंगआधी 43 इंचीचा टीव्ही देखील ऑनलाईन लिस्ट झाला आहे.
यावेळी शाओमी 65 इंच, 49 इंच आणि 32 इंच टीव्ही भारतात लाँच करण्याची शक्यता आहे. याच वर्षी जानेवारी महिन्यात चीनमध्ये 50 इंच Mi टीव्ही 4ए व्हेरिएंट लाँच करण्यात आला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच लाँच झालेल्या 55 इंच टीव्हीचा फ्लॅश सेल 22 फेब्रुवारी आणि 27 फेब्रुवारीला झाला होता. ज्यामध्ये अवघ्या 10 सेकंदात सर्व टीव्हींची विक्री झाली होती. त्यामुळे आता शाओमीच्या नव्या टीव्हीबाबत अनेकांना उत्सुकता लागून राहिली आहे.Mi fans! Today was the very first sale of #MiTV4 in India and we sold out in less than 10 seconds! Thank you for your love and support <3
Next sale on 27th February at 12 noon! https://t.co/phr2pDem1T pic.twitter.com/KkLklZKcaF — Mi India (@XiaomiIndia) February 22, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement