एक्स्प्लोर
6GB आणि 8GB रॅम व्हेरिएंट, शाओमीचा नवा स्मार्टफोन लाँच
5.99 इंच आकाराची स्क्रीन ही या फोनची सर्वात मोठी विशेषता आहे. शाओमीचा हा फोन उद्या (12 सप्टेंबर) लाँच होणाऱ्या आयफोन 8 आणि सॅमसंग गॅलक्सी नोट 8 ला टक्कर देण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : शाओमीने चीनमध्ये Mi Mix 2 हा फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच केला आहे. 5.99 इंच आकाराची स्क्रीन ही या फोनची सर्वात मोठी विशेषता आहे. शाओमीचा हा फोन उद्या (12 सप्टेंबर) लाँच होणाऱ्या आयफोन 8 आणि सॅमसंग गॅलक्सी नोट 8 ला टक्कर देण्याची शक्यता आहे.
अॅपलचा आयफोन 8 12 सप्टेंबर रोजी लाँच होत आहे. तर भारतात सॅमसंग गॅलक्सी नोट 8 लाँच होणार आहे. या दोन्हीही बिगबजेट आणि हायटेक फीचर्स फोनला शाओमी टक्कर देण्याच्या तयारीत आहे.
Mi Mix 2 मध्ये स्नॅपड्रॅगन 835 चिपसेट आणि अॅड्रीनो जीपीयू ग्राफिक चीप प्रोसेसर देण्यात आलं आहे. हा फोन 6GB आणि 8GB या दोन रॅम व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल. 6GB रॅमसोबत 64GB, 128GB आणि 256GB स्टोरेज मॉडल मिळतील. तर 8GB रॅम व्हेरिएंटसोबत 128GB स्टोरेजचा पर्याय मिळेल.
या फोनचा कॅमेराही जबरदस्त असेल. यामध्ये 12 मेगापिक्सेलचा ड्युअल रिअर कॅमेरा ड्युअल फ्लॅशसोबत देण्यात आला आहे. तर 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन फ्रेंच डिझायनर फिलिप स्ट्रॅकने डिझाईन केला आहे. याच कंपनीने या सीरिजचा पहिला Mi Mix हा स्मार्टफोनही डिझाईन केला होता.
फीचर्स :
- अँड्रॉईड 7.1 नॉगट सिस्टम
- 5.99 इंच आकाराची स्क्रीन
- 6GB आणि 8GB असे दोन रॅम व्हेरिएंट
- 6GB रॅमसोबत 64GB, 128GB आणि 256GB इंटर्नल स्टोरेज मॉडेल
- 8GB रॅम व्हेरिएंटसोबत 128GB इंटर्नल स्टोरेजचा पर्याय
- ड्युअल फ्लॅशसोबत 12 मेगापिक्सेलचा ड्युअल रिअर कॅमेरा
- 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- 3.0 क्विक चार्जिंग सपोर्ट
- 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंट – 32 हजार 335 रुपये
- 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट –35 हजार 275 रुपये
- 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट – 46 हजार रुपये
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement