एक्स्प्लोर
Advertisement
शाओमीचा MI Mix 2 आज भारतात, किंमत आणि फीचर्स
दिल्लीतील इव्हेंटमध्ये आज हा स्मार्टफोन लाँच केला जाईल. लाँचिंगसोबतच या फोनवर मोठ्या ऑफर्स असण्याचीही शक्यता आहे.
नवी दिल्ली : शाओमीने MI Mix 1 हा स्मार्टफोन लाँच केल्यानंतर काही दिवसातच या सीरिजचा MI Mix 2 हा स्मार्टफोन भारतात लाँच होणार आहे. दिल्लीतील इव्हेंटमध्ये आज हा स्मार्टफोन लाँच केला जाईल. लाँचिंगसोबतच या फोनवर मोठ्या ऑफर्स असण्याचीही शक्यता आहे.
शाओमीने हा स्मार्टफोन चीनमध्ये गेल्या महिन्यात लाँच केला होता. या फोनची सर्वात मोठी विशेषता म्हणजे यामध्ये 5.99 इंच आकाराची स्क्रीन देण्यात आली आहे. शिवाय या सोबत कंपनी एक स्पेशल व्हेरिएंटही लाँच करण्याची शक्यता आहे.
या फोनची किंमत भारतात 30 हजार रुपये असण्याची शक्यता आहे. मात्र लाँचिंग इव्हेंटमध्येच या फोनची नेमकी किंमत समोर येईल. काही तासांमध्ये या फोनची किंमत आणि सर्व फीचर्स समोर येतील. हा मिड प्रीमियम स्मार्टफोन असण्याची शक्यता आहे.
चीनमध्ये हा फोन रॅम आणि स्टोरेज आधारावर वेगवेगळ्या तीन व्हेरिएंटवर लाँच करण्यात आला आहे. 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 3299 युआन (जवळपास 32 हजार 300 रुपये), 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 3599 युआन (जवळपास 35 हजार 300 रुपये), तर 6GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 3999 युआन (जवळपास 39 हजार 200 रुपये) एवढी आहे.
5.99 इंच आकाराच्या स्क्रीनसह या फोनमध्ये 6GB रॅम आणि स्नॅपड्रॅगन 835 प्रोसेसर देण्यात आलं आहे. 12 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा हे फीचर्स यामध्ये असण्याची शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
महाराष्ट्र
नाशिक
Advertisement