एक्स्प्लोर
शाओमीचा Mi A1 स्मार्टफोन लाँच, किंमत 14,999 रुपये
शाओमीनं आपला पहिला ड्यूल कॅमेरा सेटअप असणारा स्मार्टफोन Mi A1 भारतात लाँच केला आहे.
![शाओमीचा Mi A1 स्मार्टफोन लाँच, किंमत 14,999 रुपये Xiaomi Mi A1 Smartphone Launched In India Latest Update शाओमीचा Mi A1 स्मार्टफोन लाँच, किंमत 14,999 रुपये](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/09/05172555/XIAOMI1-580x395.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : शाओमीनं आपला पहिला ड्यूल कॅमेरा सेटअप असणारा स्मार्टफोन Mi A1 भारतात लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत 14,999 रुपये आहे. 12 सप्टेंबरपासून हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट आणि Mi.comवर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉईडचे अपडेट व्हर्जनही मिळणार आहेत.
या स्मार्टफोनसोबत एअरटेल सब्सक्राइबर्सला 200 जीबी 4जी डेटा मोफत मिळणार आहे. हा स्मार्टफोन ब्लॅक, गोल्ड रंगामध्ये उपलब्ध असणार आहे.
शाओमी Mi A1 स्मार्टफोनचे खास फीचर:
शाओमी Mi A1 स्मार्टफोनमध्ये ड्यूल सिम सपोर्ट असून यामध्ये अँड्रॉईड नॉगट ऑपरेटिंग सिस्टमही देण्यात आली आहे. यामध्ये 5.5 इंच स्क्रीन असून याचं रेझ्युलेशन 1080x1920 पिक्सल आहे. तसेच यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लासही देण्यात आली आहे.
या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 625 प्रोसेसर देण्यात आला असून यामध्ये 4 जीबी रॅम देण्यात आली आहे.
या स्मार्टफोनची खासियत म्हणजे यांचा ड्यूल रिअर कॅमेरा. याचा रिअर कॅमेरा 12 मेगापिक्सल असणार आहे. तर फ्रंट कॅमेरा 5 मेगापिक्सल असणार आहे.
तसेच यामध्ये 64 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. जी 128 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते.
या स्मार्टफोनची बॅटरी क्षमता 3080 mAh आहे. तर यात 4G VoLTE, वाय-फाय, जीपीएस, यूएसबी टाइप-सी पोर्ट हे फीचरही देण्यात आले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
भारत
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)