एक्स्प्लोर
शाओमीचा आणखी एक बजेट स्मार्टफोन लाँच
हा स्मार्टफोन Mi 5X चं सक्सेसर व्हर्जन आहे, जे भारतात MiA1 या नावाने लाँच करण्यात आलं होतं. भारतामध्ये या नव्या स्मार्टफोनचं नाव MiA2 असू शकतं.
मुंबई : शाओमीने आपला आणखी एक बजेट स्मार्टफोन Mi 6X लाँच केला आहे. हा स्मार्टफोन Mi 5X चं सक्सेसर व्हर्जन आहे, जे भारतात MiA1 या नावाने लाँच करण्यात आलं होतं. भारतामध्ये या नव्या स्मार्टफोनचं नाव MiA2 असू शकतं.
कॅमेरा हे या फोनचं वैशिष्ट्य ठरू शकतं. या फोनच्या कॅमेऱ्यामध्ये AI म्हणजे आर्टिफिशिअल इंटेलिजेन्स फीचर देण्यात आलं आहे, ज्यामुळे ऑब्जेक्ट आपोआप ओळखळं जातं आणि इतर सेटिंगही आपोआप अडजस्ट होतात. शिवाय अर्ध्या तासात 50 टक्के बॅटरी चार्ज होते, असा दावाही कंपनीने केला आहे.
Mi 6X ची किंमत
शाओमी Mi 6X चे 4GB रॅम/64GB इंटर्नल स्टोरेज आणि 6GB रॅम/128GB इंटर्नल स्टोरेज असे दोन व्हेरिएंट लाँच करण्यात आले आहेत. ज्याची किंमत क्रमशः 1599 युआन (जवळपास 16 हजार रुपये) आणि 1799 युआन (जवळपास 18 हजार रुपये) ठेवण्यात आली आहे. या फोनच्या 128GB व्हर्जनची किंमत 1999 युआन (जवळपास 20 हजार रुपये) असेल.
शाओमी Mi 6X चे स्पेसिफिकेशन
5.99 इंच आकाराची स्क्रीन
2.2GHz क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 प्रोसेसर
4GB रॅम/64GB इंटर्नल स्टोरेज आणि 6GB रॅम/128GB इंटर्नल स्टोरेज दोन व्हर्जन
12MP+20MP ड्युअल रिअर कॅमेरा
20 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
फेस-अनलॉक फीचर
3010mAh क्षमतेची बॅटरी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
सोलापूर
Advertisement