Xiaomi 12 Pro 5G स्मार्टफोन 'या' दिवशी भारतात होणार लाँच; जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स
Xiaomi कंपनीनं त्यांच्या या स्मार्टफोनचा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर करून नेटकऱ्यांना या फोनच्या लाँचबद्दल माहिती दिली आहे.
Xiaomi 12 Pro 5G : Xiaomi कंपनीचा Xiaomi 12 Pro 5G हा स्मार्टफोन गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये चीनमध्ये लाँच करण्यात आला होता. आता हा फोन भारतामध्ये देखील लाँच केला जाणार आहे. Xiaomi कंपनीनं त्यांच्या या स्मार्टफोनचा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर करून नेटकऱ्यांना या फोनच्या लाँचबद्दल माहिती दिली आहे.
Xiaomi India या ट्विटर अकाऊंटवरून Xiaomi 12 Pro 5G या फोनचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये द शो स्टोपर असं लिहलेलं दिसत आहे. 'हे तेच आहे ना ज्याची तुम्ही उत्सुकतेनं वाट पाहात होता. Xiaomi 12 Pro 5G हा फोन 27 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता लाँच होणार आहे. तारिख लक्षात ठेवा. ', असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.
Is this the one you've been waiting for?#Xiaomi12Pro5G is launching on 27th April, 12 Noon
— Xiaomi India (@XiaomiIndia) April 18, 2022
Save the date!
Xiaomi 12 Pro 5G फोनचे स्पेसिफिकेशन्स
या फोनमध्ये 6.67 इंच 2K AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन स्नॅपड्रॅगन eight जेन 1 SoC ने ऑपरेट केला जाईल. 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज या फोनमध्ये दिले जाईल. पॉवर बॅकअपसाठी फोनमध्ये 4600mAh बॅटरी सेट केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Oppo F21 Pro : Oppo F21च्या सीरिजचे दोन धमाकेदार स्मार्टफोन भारतात लॉन्च, 'हे' आहेत दमदार फीचर्स
- Lenovo Tablet On Amazon : आनंदाची बातमी! 'या' Lenovo टॅबलेटवर मिळतेय चक्क 50 टक्क्यांची सूट
- Amazon Sale : Alexa वर आधारित हा आहे OnePlus चा नवीन स्मार्टफोन, ऑफरमध्ये मिळतेय चक्क 25 हजारांपर्यंत सूट!
- Amazon Sale : Oppo च्या या स्मार्टफोनवर लॉन्च होताच 20 हजार रुपयांपर्यंतची डिस्काउंट ऑफर उपलब्ध, वाचा सविस्तर