एक्स्प्लोर
Pokémon GO खेळताना महिलेसोबत घडली विचित्र घटना
न्यू जर्सी: अमेरिकेतील न्यू जर्सीमध्ये Pokémon GO गेम खेळताना एका महिलेसोबत एक विचित्र घटना घडली. गेम खेळता खेळता महिला अचानक दफनभूमीमधील एका झाडामध्येच अडकली. तिला अग्निशमन दलाच्या मदतीनं बाहेर काढण्यात आलं.
Pokémon GO खेळता खेळता महिला न्यू जर्सीतील क्लार्क्सबोरो येथील दफनभूमीमध्ये पोहचली. त्यावेळी ती एका झाडामध्ये वाईटरित्या अडकली. त्यानंतर तिनं आपात्कालीन क्रमांकवर फोन करुन मदत मागितली.
महिलेने ईस्ट ग्रीनवीच टाउनशिप फायरला बोलवलं आणि त्यानंतर तिला शिडीच्या मदतीनं झाडातून सोडवण्यात आलं. एका फेसबुक पोस्टच्या मदतीनं, ग्रीनविच टाऊनशिपच्या अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितलं की, Pokémon GO खेळताना लक्ष दिलं पाहिजे की, तुम्ही नेमकं काय खेळत आहात.
या घटनेनंतर महिलेनं सांगितलं की, 'गेम खेळताना मी सारं काही विसरुन गेली आणि माझ्या लक्षातच आलं नाही मी काय करतेय. त्यामुळे ही घटना घडली.
तसं पाहिलं तर आजकाल Pokémon GO गेम खेळताना अनेक जणांना अशा प्रकारांना सामोरं जावं लागलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement