10 जानेवारीपासून Windows चा हा Version होणार बंद, तुम्हीही तुमचं सिस्टीम करा चेक
Windows 8.1 Version: सॉफ्टवेअर क्षेत्रातील दिग्गज मायक्रोसॉफ्ट कंपनीने (Microsoft) आपल्या यूजर्सला धक्कादायक बातमी दिली आहे.
Windows 8.1 Version: सॉफ्टवेअर क्षेत्रातील दिग्गज मायक्रोसॉफ्ट कंपनीने (Microsoft) आपल्या यूजर्सला धक्कादायक बातमी दिली आहे. कंपनीने म्हटले आहे की, त्यांची फ्लॅगशिप ऑपरेटिंग सिस्टम विंडोज 8.1 (Windows 8.1) लवकरच बंद होणार आहे. कंपनीने 10 जानेवारी 2023 पासून विंडोजचे हे व्हर्जन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर युजर्स त्यांच्या सिस्टमवर विंडोज 8.1 व्हर्जन वापरू शकणार नाहीत. यातच असे बरेच युजर्स आहेत जे अजूनही विंडोजचे हे व्हर्जन वापरत आहेत. परंतु आता काही दिवसांनंतर ते या व्हर्जनमध्ये आवश्यक सुरक्षा अपडेट मिळू शकणार नाही. 10 तारखेनंतर विंडोज 8.1 युजर्सला टेक्निकल सपोर्ट आणि सॉफ्टवेअर अपडेट मिळणे बंद होईल, असे कंपनीने म्हटले आहे.
Windows 8.1 Version: युजर्सला काय करायला हवं?
मायक्रोसॉफ्टने युजर्सला सल्ला दिला आहे की, जे युजर्स हे व्हर्जन वापरत आहेत त्यांनी त्यांचे डिव्हाइस विंडोजच्या सध्या कार्यरत असलेल्या व्हर्जनवरून अपग्रेड करावे. कंपनीने वेबसाइटद्वारे सांगितले आहे की, जर तुम्ही सध्याच्या रिलीझसह व्हर्जन डाउनलोड करू शकत नसाल, तर तुम्ही तुमचे डिव्हाइस विंडोज 11 चालवणाऱ्या डिव्हाइससह अपडेट केले पाहिजे.
Windows 8.1 Version: राहणार सुरक्षेचा धोका
कंपनीने हे देखील स्पष्ट केले आहे की, ती विंडोज 8.1 साठी एक्स्टेंडेड सिक्युरिटी अपडेट (ESU) प्रोग्राम ऑफर करणार नाही. जे यजर्स 10 जानेवारीनंतरही ते वापरत राहणार असतील तर त्यांना मालवेअर आणि व्हायरसचा सतत धोका राहणार आहे.
Ways to install Windows 11: असं करा अपडेट
- यासाठी तुम्हाला मायक्रोसॉफ्टच्या डाउनलोड विंडोज 11 वेबसाइटवर जावे लागेल. येथे गेल्यानंतर खाली स्क्रोल करा आणि डाउनलोड Download Windows 11 Disk Image (ISO) सेक्शनवर जा.
- ड्रॉप-डाउन मेनूमधून डाउनलोड निवडा वर क्लिक करून Windows 11 (मल्टी-एडीशन ISO) निवडा.
- खाली स्क्रोल करा आणि ड्रॉप डाउन मेनूमधील Product Language वर क्लिक करा.
- आता येथे तुम्ही तुमची भाषा निवडा आणि Confirm वर क्लिक करा.
- आता ISO फाइल मिळवण्यासाठी 64-बिट डाउनलोड निवडा.
- फाइल एक्सप्लोरर उघडा आणि डाउनलोड केलेल्या फाइलच्या फोल्डरवर जा. येथे ISO फाईलवर राईट क्लिक करा आणि Mount वर क्लिक करा.
- सेटअप सुरू करण्यासाठी setup.exe फाइलवर डबल क्लिक करा.
- Install Windows 11 पेज आल्याव, चेंज हाऊ सेटअप डाउनलोड्स अपडेट्स लिंकवर क्लिक करा आणि Not right now आणि पुढील पर्यायावर क्लिक करा.
- तुमचे डिव्हाइस हे व्हर्जन install करू शकत असल्यास येथे license terms accept करून Next वर क्लिक करा.
- जर तुम्हाला वैयक्तिक फाइल्स ठेवायच्या असतील तर त्याची पुष्टी करा आणि install वर क्लिक करा.