Airtel ची 5G सेवा कधी सुरू होणार? सुनील मित्तल यांनी दिलं उत्तर
ज्यासाठी अनेक वापरकर्ते 5G सेवेची आतुरतेने वाट पाहत आहेत. भारती एंटरप्रायझेसचे
Airtel 5G Service: भारतात लवकरच 5G सेवा सुरू होणार आहे. अनेक नेटकरी देखील 5G सेवेची आतुरतेने वाट पाहत आहेत. 5G च्या या यादीत Airtel चे देखील मोठे नाव आहे. ज्यासाठी अनेक वापरकर्ते 5G सेवेची आतुरतेने वाट पाहत आहेत. भारती एंटरप्रायझेसचे (Bharti Enterprises) चेअरमन सुनील मित्तल (Sunil Mittal) यांनी सांगितले आहे की, ऑक्टोबरपर्यंत Bharti Airtel भारतात 5G सेवा जारी करेल.
5G लॉन्च होण्यास उशीर झालेला नाही
सुनील मित्तल म्हणाले की, ''5G ने पाश्चिमात्य जगात पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. भारतातील काही लोकांना असे वाटते की 5G च्या बाबतीत भारत मागे राहिला आहे, परंतु तसे नाही. भारतात 5G सेवा सुरू होण्यास उशीर झालेला नाही. ही योग्य वेळ आहे. तुम्ही पाहू शकता की, आता भारतात 5G उपकरणांच्या किमतीही कमी केल्या जात आहेत. ही भारतासारख्या देशासाठी चांगली वेळ आहे.'
एअरटेल कंपनीचे चेअरमन सुनील मित्तल म्हणाले की, भारत सरकारने लिलावात भरपूर स्पेक्ट्रम सादर केले होते. 5G साठी मोठा स्पेक्ट्रम खूप महत्वाचा आहे. कारण त्याशिवाय 5G ची खरी मजा येणार नाही. ते म्हणाले की, मला वाटते की भारत आता स्पेक्ट्रम आणि उपकरणाच्या दृष्टिकोनातून 5G सेवा सुरू करण्यास पूर्णपणे तयार आहे. सुनील मित्तल यांनी पुढे सांगितले की, एअरटेल गेल्या 24 महिन्यांपासून 5G रोलआउटची तयारी करत आहे. 2022 च्या उत्तरार्धात आम्ही ते लॉन्च करू, असा आम्हाला अंदाज होता. काही स्पर्धकांचा असा विश्वास होता की, 5G भारतात 2020 च्या उत्तरार्धात किंवा 2021 मध्ये सुरू होईल.
व्होडाफोन-आयडिया पेमेंट करण्याच्या प्रक्रियेत
एअरटेल व्यतिरिक्त (Airtel) रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि अदानी डेटा नेटवर्क्सने (Adani Data Networks) देखील 5G स्पेक्ट्रमसाठी त्यांचे थकबाकी दूरसंचार मंत्रालयाकडे (Telecom Ministry) भरले आहे. तर व्होडाफोन-आयडिया (VI) सध्या त्याचे पेमेंट करण्याच्या प्रक्रियेत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Infinix Note 12 Pro: 256 GB स्टोरेज असलेला सर्वात स्वस्त फोन लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
Sony Xperia 5 IV 5G : Sony लवकरच लॉन्च करणार आपला Waterproof Smartphone, जाणून घ्या