एक्स्प्लोर
Advertisement
व्हॉट्सअॅप लवकरच तुमचे चॅट, फोटो, व्हिडिओ डिलीट करणार
व्हॉट्सअॅप यूझर्सना आपल्या अकाऊण्टमधील डेटा गुगल ड्राईव्हमध्ये साठवू देण्यास गुगलने मान्यता दिली आहे.
मुंबई : व्हॉट्सअॅप लवकरच आपल्या यूझर्सचा डेटा डिलीट करणार आहे. व्हॉट्सअॅपचा डेटा नोव्हेंबर महिन्यापासून व्हॉट्सअॅप ऐवजी गुगल ड्राईव्हमध्ये स्टोअर करण्यात येईल, त्यामुळे आतापर्यंतचा डेटा हवा असल्यास तुम्हाला वेळीच बॅकअप घ्यावा लागेल.
व्हॉट्सअॅप आणि गुगलमध्ये झालेल्या डीलनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या डीलनुसार व्हॉट्सअॅपच्या सिस्टीममध्ये बदल करण्यात येणार आहे. त्यासाठी व्हॉट्सअॅपला आपल्या यूझर्सचा डेटा डिलीट करावा लागणार आहे. यामध्ये तुमचं चॅट, फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ फाईल्सचा समावेश आहे.
व्हॉट्सअॅप यूझर्सना आपल्या अकाऊण्टमधील डेटा गुगल ड्राईव्हमध्ये साठवू देण्यास गुगलने मान्यता दिली आहे. विशेष म्हणजे त्यासाठी गुगल ड्राईव्हची 15GB मोफत स्पेस वापरली जाणार नाही, तर अतिरिक्त जागेत हा डेटा स्टोअर करण्यात येईल.
नोव्हेंबरनंतर तुमच्या चॅट, फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ फाईल्सचा बॅकअॅप गुगल ड्राईव्हमध्ये घेण्यात येईल. त्यासाठी 12 नोव्हेंबरपर्यंत यूझर्सना आपल्या डेटाचा बॅकअप घ्यावा लागेल. तसं न केल्यास तुमचा सर्व डेटा नाहीसा होईल.
व्हॉट्सअॅप डेटाचा मॅन्युअल बॅकअप कसा घ्याल?
गुगल ड्राईव्ह सेट अप करा
व्हॉट्सअॅप ओपन करा.
मेन्यू > सेटिंग्स > चॅट्स > चॅट बॅकअप
बॅकअपवर क्लिक केल्यास गुगल ड्राईव्हमध्ये ऑटोमॅटिक बॅकअप होईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement