WhatsApp Update : व्हाट्सएप डीपी प्रमाणे ऑनलाईन स्टेटसही लपवता येणार, नवीन अपडेटमध्ये येणार फिचर्स
WhatsApp Update :
![WhatsApp Update : व्हाट्सएप डीपी प्रमाणे ऑनलाईन स्टेटसही लपवता येणार, नवीन अपडेटमध्ये येणार फिचर्स whatsapp update after whatsapp dp soon users can hide online status WhatsApp Update : व्हाट्सएप डीपी प्रमाणे ऑनलाईन स्टेटसही लपवता येणार, नवीन अपडेटमध्ये येणार फिचर्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/02/c4d2a6cea1c7f9a1e5ebab6fea544e53_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
WhatsApp Update : व्हाट्सएपवर लवकरच एक नवीन फीचर येणार आहे. लोक या फीचरची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. कंपनी काही काळापासून गोपनीयतेसाठी आपले फिचर्स मजबूत करत आहे. अलीकडेच कंपनीने निवडक वापरकर्त्यांसाठी डीपी, लास्ट सीन आणि स्टेटस लपवण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. आता लवकरच आणखी एक नवीन फीचर येणार आहे.
या फीचरच्या मदतीने तुम्ही तुमचा ऑनलाइन स्टेटस लपवू शकता. म्हणजेच तुम्हाला वाटेल तेच तुमचा ऑनलाईन स्टेटस बघतील, ज्यांना नको ते पाहणार नाहीत. हे एक महत्त्वाचे फिचर्स आहे. या फिचर्सच्या मदतीने तुम्ही 'ऑनलाइन' स्टेटस लपवू शकाल.
व्हॉट्सअॅप मेसेज डिलीटचे फीचरही अपडेट केले जात आहे. वापरकर्त्यांना वेळेच्या मर्यादेचे नवीन पर्याय मिळतील. WABetainfo च्या अहवालानुसार, तुम्ही हे ठरवू शकाल की व्हॉट्सअॅपवर तुमचा शेवटचा सीन कोण पाहू शकेल. सध्या हे फीचर डेव्हलपमेंटच्या टप्प्यात आहे.
नवीन फिचर्स कसे काम करेल?
रिपोर्ट्सनुसार, यामध्ये तुम्हाला दोन पर्याय मिळतील. तुम्ही प्रत्येकजण आणि सेम ॲज लास्ट सीन यापैकी निवडू शकता. लास्ट सीन प्रमाणेच म्हणजे तुम्ही लास्ट सीनसाठी केलेली सेटिंग.
समजा तुम्ही तुमच्या संपर्कांसाठीच शेवटचा सीन सेट केला आहे, तर तुमची ऑनलाइन स्थिती देखील फक्त तुमच्या संपर्कांना दिसेल.
जर तुम्ही काही लोकांशिवाय बाकीच्या लोकांसाठी लास्ट सीन चालू केले असेल तर ऑनलाइन स्टेटस देखील असे दिसेल. हे फिचर्स कधी येईल? याबाबत सध्या कोणतीही माहिती नाही. पण युजर्स बऱ्याच दिवसांपासून या फीचरची वाट पाहत होते.
व्हॉट्सअॅप आपले आणखी एक नवीन अपडेट्स जारी करण्यात करणार आहे. नव्या अपडेट्सनुसार व्हॉट्सअॅपने ग्रुप वापरणाऱ्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे. व्हॉट्सअॅप ग्रृपमध्ये आता एका वेळी 512 लोकांना सहभागी करून घेता येणार आहे. व्हॉट्सअॅपकडून लवकरच हे नवे अपडेट्स येणार आहे.
महत्वाच्या बातम्या
Aurangabad: स्वतःचे नग्न फोटो गावातील महिलांना व्हॉटस्ॲपवरून पाठवायचा; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)