WhatsApp New Feature: व्हॉट्सअॅपच्या नव्या फीचरमुळे व्हिडीओची क्वॉलिटी खराब होणार नाही
यूजर्सना लवकरच व्हिडीओ पाठवण्यासाठी अनेक पर्याय मिळू शकतात. यात व्हिडीओ पाठवण्यापूर्वी तुम्हाला बेस्ट क्वालिटी मोड, डेटा सेव्हर मोड आणि ऑटो मोडसारखे मोड्स मिळतील.
Whatsapp New Feature : व्हॉट्सअॅपवर चॅटिंगसह वेगवेगळे व्हिडीओ देखील शेअर केले जातात. मात्र व्हॉट्सअॅपवर पाठवलेल्या व्हिडीओची क्वॉलिटी व्हिडीओ पाठवल्यानंतर बरीच बदलते. व्हॉट्सअॅपवर पाठवलेल्या व्हिडीओंमध्ये जेनरेशन लॉस होतो. सोप्या भाषेत सांगायचे तर क्वॉलिटी खराब होते. अशा परिस्थितीत बरेच लोक व्हिडीओ पाठवण्यासाठी इतर अॅप्सचा वापर करतात. पण आता व्हिडीओ क्वॉलिटी खराब होण्याची काळजी करण्याची गरज नाही. लवकरच व्हॉट्सअॅप असे एक फीचर आणणार आहे ज्यात युजर्स व्हिडीओ सेंड करताना वेगवेगळ्या व्हिडिओ क्वालिटीची निवड करू शकतात.
नवं फीचर कसं काम करेल?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, यूजर्सना लवकरच व्हिडीओ पाठवण्यासाठी अनेक पर्याय मिळू शकतात. यात व्हिडीओ पाठवण्यापूर्वी तुम्हाला बेस्ट क्वालिटी मोड, डेटा सेव्हर मोड आणि ऑटो मोडसारखे मोड्स मिळतील. आपण यापैकी कोणत्याही मोड निवडू शकता. यावरुन आपण शेअर केलेल्या व्हिडीओची क्वॉलिटी ठरेल. हे फीचर त्यांच्यासाठी खास आहे ज्यांना चांगल्या क्वॉलिटीचे व्हिडिओ पाठवायचे आहेत, परंतु व्हॉट्सअॅपवर व्हिडीओ क्वॉलिटी कमी झाल्यामुळे ते इतर प्लॅटफॉर्मवरुन व्हिडीओ पाठवतात. पण आता नवीन व्हॉट्सअॅप फीचर आल्यानंतर यूजर्सना डेटा सेव्ह करण्याचा आणि चांगल्या प्रतीचे व्हिडीओ पाठवण्याचा पर्याय मिळेल.
मात्र बेस्ट क्वॉलिटी मोडसाठी काही मर्यादा असतील की नाही हे अद्याप माहित नाही. व्हॉट्सअॅप मोडद्वारे व्हिडीओ पाठवल्यानंतर मूळ व्हिडीओचं रिझोल्यूशन राहील का? अशी अपेक्षा आहे की 4 के आणि 8 के क्लिप्स सारख्या उच्च रिझोल्यूशन व्हिडिओंमध्ये काही कमतरता राहू शकतात.
नवीन व्हिडिओ सेटिंग आल्यानंतर आपल्याला सर्व व्हिडिओसाठी हा पर्याय मिळेल. आता जर आपण डेटा सेव्हिंग मोडमध्ये असाल आणि आपणास उच्च रिझोल्यूशनसह व्हिडीओ पाठवायचा असेल तर यासाठी आपल्याला सेटिंग्जमध्ये जावं लागेल आणि बदल करणे आवश्यक असेल. आपल्याला आपला व्हिडीओ अपलोड पर्याय बदलून पाठवावा लागेल. मग आपण परत आपल्या मूळ मोडवर जाऊ शकता.
सध्या हे फीचर डेव्हलप केलं जात आहे. हे फीचर येत्या काही दिवसांत व्हॉट्सअॅप अपडेटसह समाविष्ट केले जाऊ शकते. हे फीचर अँड्रॉइड आणि आयफोन यूजर्ससाठी जारी केले जाऊ शकते.