(Source: ECI/ABP News/ABP Majha)
WhatsApp | नवीन फिचरमुळे व्हॉट्सअॅपवर ग्रुप कॉलिंग झालं सोपं
व्हॉट्सअॅपने आपल्या अॅप्समध्ये अनेक बदल केले आहेत. आता अॅप आणखी एक नवीन फिचर घेऊन आलं आहे. कंपनीने आपल्या अॅपवरील ग्रुपमध्ये ऑडियो रेकॉर्डिंग शेअर करणं किंवा व्हिडीओ कॉल करणं सोपं केलं आहे.
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे भारतासह जगभरातील अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अशातच इस्टंट मेसेजिंग अॅप असलेल्या व्हॉट्सअॅपने आपल्या अॅप्समध्ये अनेक बदल केले आहेत. तसेच कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या काळात अनेक अफवा आणि फेक न्यूज व्हॉट्सअॅप मार्फत परवण्यात येत आहेत. अशा अफवांवर लगाम लावण्यासाठी व्हॉट्सअॅपने फॉरवर्ड होणाऱ्या मेसेजवर बंधन लावून त्यावर मर्यादा घातली होती. आता अॅप आणखी एक नवीन फिचर घेऊन आलं आहे. कंपनीने आपल्या अॅपवरील ग्रुपमध्ये ऑडियो रेकॉर्डिंग शेअर करणं किंवा व्हिडीओ कॉल करणं सोपं केलं आहे. याबाबतची माहिती कंपनीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून दिली आहे.
व्हॉट्सअॅपने ट्वीट करत म्हटलं आहे की, 'आम्ही व्हॉट्सअॅपवर चार किंवा त्यापेक्षा कमी लोक असणाऱ्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये ग्रुप कॉल करणं आधीपेक्षा सोपं केलं आहे. त्यासाठी तुम्हाला ग्रुप चॅटमध्ये वरच्या बाजूला दिलेल्या व्हिडीओ कॉल किंवा व्हॉइस कॉल आयकॉनवर क्लिक करावं लागेल. या एका टॅपमुळे तुम्ही थेट ग्रुपमधील सर्व मेंबर्ससोबत व्हिडीओ कॉलमार्फत संवाद साधू शकता.'
व्हॉट्सअॅपच्या या नव्या फिचरअंतर्गत तुम्हाला तुमच्या ग्रुप मेंबर्सना वेगवेगळं सिलेक्ट करावं लागणार नाही. आता युजर्सना ग्रुपमध्ये व्हिडीओ किंवा ऑडियो क़ल करण्यासाठी ग्रुप ग्रुप चॅटमध्ये वरच्या बाजूला दिलेल्या व्हिडीओ कॉल किंवा व्हॉइस कॉल आयकॉनवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर सर्व मेंबर्सना एकत्र व्हिडीओ किंवा ऑडियो कॉलमध्ये समावेश होणार आहे.'
दरम्यान, ही सुविधा WhatsApp च्या फक्त त्याच ग्रुपमध्ये देण्यात येणार आहे. ज्यामध्ये चार किंवा त्यापेक्षा कमी लोकांचा समावेश असणार आहे. अशातच अॅप अन्ड्रॉइड आणि आयओएसवरही उपलब्ध असणार आहे.
संबंधित बातम्या :
Fact Check | कोरोना संकटामुळे तुमच्या प्रत्येक WhatsApp मेसेजवर सरकारची नजर? 5G मुळे कोरोना होतो? काय आहे या अफवेमागील सत्य#Aarogyasetu | सरकारकडून 'आरोग्य सेतु' अॅप लॉन्च, कोरोनापासून दूर राहण्यास मदत करणारं अॅ