एक्स्प्लोर
व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलिंगसाठी आता 'पिक्चर टू पिक्चर' फीचर
पिक्चर टू पिक्चर आणि टेक्स्ट स्टेटस हे दोन फीचर्सची व्हॉट्सअॅपने टेस्टिंग सुरु केली आहे.

मुंबई : व्हॉट्सअॅपने बिझनेस फीचरनंतर आता अँड्रॉईड आणि आयओएस युझर्ससाठी दोन नवे फीचर्स आणले आहेत. पिक्चर टू पिक्चर आणि टेक्स्ट स्टेटस या दोन फीचर्सचा यामध्ये समावेश आहे. पिक्चर टू पिक्चर फीचर : पिक्चर टू पिक्चर फीचरमुळे व्हिडिओ कॉलिंग आणखी चांगल्या पद्धतीने करता येणार आहे. व्हिडिओ कॉल चालू असताना विंडो छोटी करुन तुम्ही चॅटिंगही करु शकता. कंपनीने या फीचरची चाचणी सुरु केली आहे. या फीचरला PiP या नावाने ओळखतात. लवकरच हे फीचर सर्व युझर्ससाठी रोल आऊट होण्याची शक्यता आहे. टेक्स्ट स्टेटस फीचर : व्हॉट्सअॅपने नवीन अपडेट जारी केली आहे. यामुळे व्हॉट्सअॅप युझर्सना टेक्स्ट स्टेटस शेअर करता येणार आहे. फेसबुक प्रमाणेच तुम्ही आता कलरफुल बॅकग्राऊंडमध्ये स्टेटस शेअर करु शकता. व्हॉट्सअॅपच्या ऑफिशिअल व्हर्जनमध्ये हे फीचर उपलब्ध आहे.
आणखी वाचा























