एक्स्प्लोर
या फोनवर व्हॉट्सअॅप कायमचं बंद होणार!
नवी दिल्ली : जुन्या फोनवर व्हॉट्सअॅप आता कायमचं बंद होणार आहे. व्हॉट्सअॅपने प्रायव्हसी, सिक्युरीटी आणि एनक्रिप्शन मजबूत करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. कारण जुन्या फोनमध्ये व्हॉट्सअॅपचे नवे सिक्युरीटी फीचर्स सपोर्टीव्ह नाहीत.
व्हॉट्सअॅपचे नवे सिक्युरीटी फीचर्स हे केवळ स्मार्टफोनच्या ऑपरेटिंग सिस्टीमवर आधारीत आहेत. त्यामुळे आता अँड्रॉईड 2.0, 2.2, आयफोनच्या 3G S आणि IOS 6 वर व्हॉट्सअॅप कायमचं बंद होणार असल्याची माहिती आहे.
2017 पासून अनेक जुन्या व्हर्जनच्या स्मार्टफोनवर व्हॉट्सअॅप बंद होणार आहे. याला आयफोन देखील अपवाद नाही. त्यामुळे या फोनधारकांना आता व्हॉट्सअॅप वापरण्यासाठी नव्या फोनचाच पर्याय असेल.
अँड्रॉईड 2.0, 2.2 वर चालणारे स्मार्टफोन, टॅब्लेट्स आणि विंडोज 7 वर व्हॉट्सअॅप चालणार नाही. त्यामुळे विंडोज युझर्सला अपडेट करणं आता गरजेचं होणार आहे.
दरम्यान व्हॉट्सअॅप ब्लॅकबेरी ओएस, ब्लॅकबेरी 10, नोकिया S40 आणि नोकिया S60 या फोनवर जून 2017 पर्यंत चालणार आहे.
संबंधित बातमी : ... तर व्हॉट्सअॅप 2017 पासून लाखो स्मार्टफोनवर बंद होणार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement