एक्स्प्लोर

फोटो खरा की खोटा? पडताळणी होणार, व्हाॅटसअॅपच्या जगात 5 नवे भन्नाट फीचर्स येणार

यासोबतच अनेक नवीन फीचर्स व्हाॅटसअॅप आपल्या युझर्ससाठी आणणार आहे. यामध्ये 5 मुख्य फीचर्स असे आहेत जे लवकरच आपल्या मोबाईलमध्ये दिसून येणार आहेत.

मुंबई :  जगातील सर्वाधिक प्रसिद्ध मेसेंजर अॅप असलेले व्हाॅटसअॅप वेळोवेळी आपल्या युझर्ससाठी नव्या नव्या गोष्टींचा अविष्कार करत असते. सध्या व्हाॅटसअॅपचे एकूण १.३ बिलियन युझर्स आहेत. सध्या व्हाटसअॅपला फेक न्यूजला सामोरे जावे लागत आहे. यासाठी व्हाटसअॅपने मेसेज फॉरवर्डची मर्यादा कमी केली आहे. यासोबतच अनेक नवीन फीचर्स व्हाॅटसअॅप आपल्या युझर्ससाठी आणणार आहे. यामध्ये 5 मुख्य फीचर्स असे आहेत जे लवकरच आपल्या मोबाईलमध्ये दिसून येणार आहेत.  . काय आहेत नवीन फीचर्स रिव्हर्स इमेज सर्च व्हाॅटसअॅप बीटा 2.19.73 अपडेटमध्ये रिव्हर्स इमेज सर्च या फीचरचा समावेश होणार आहे. यामुळे युझरला आपल्या चॅटबॉक्समध्ये आलेल्या फोटोची पडताळणी करणे सोपे होणार आहे. चॅटबॉक्समध्ये आलेल्या फोटोला या माध्यमातून युझरला सरळ गुगलमध्ये सर्च करून सदर फोटो खरा की खोटा याबद्दल माहिती मिळू शकणार आहे. हे फीचर सध्या टेस्टिंग मोडमध्ये आहे. डार्क मोड अनेकदा युझरला व्हाॅटसअॅपच्या तीव्र प्रकाशामुळे त्रासाचा सामना करावा लागतो. रात्रीच्या वेळी या गोष्टीचा जास्त सामना करावा लागतो. यासाठी व्हाॅटसअॅप आता डार्क मोड आणणार आहे. यामुळे युझर आरामात तीव्र प्रकाशाच्या त्रासाशिवाय रात्रीच्या वेळी देखील व्हाॅटसअॅप वापरू शकेल. यामुळे बॅटरीची देखील बचत होणार आहे. 3 डी टच अॅक्शन   हे फीचर आयफोन युझर्ससाठी एक्सक्लुझिव्ह फीचर आहे. या फीचरमुळे युझर दुसऱ्या युझरचे स्टेटस त्याला माहिती न होऊ देता वाचू शकणार आहेत. हे फीचर  सध्या बीटा युझर्ससाठी उपलब्ध आहे जे लवकरच सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे. प्रायव्हेट रिप्लाय   या फीचरचा उपयोग काही दिवसांपासून केला जात आहे. हे फीचर लवकरच  iOS मध्येही दिले जाणार आहे. या फीचरमुळे युझर कोणत्याही ग्रुपचॅटमध्ये अन्य युझरला प्रायव्हेटमध्ये रिप्लाय करू शकणार आहे. ऑडीओ पिकर या फीचरच्या मदतीने आपण अन्य युझरला ऑडीओ फाईल पाठवताना स्वतः ऐकू शकणार आहोत. सोबतच आपल्या फोनमधील म्युझिक फाईलची लिस्ट तयार होणार आहे. या ऑडीओ लिस्टद्वारे युझर ३० फाईल एकत्रित पाठवू शकणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी

कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?

Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट

Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय

Embed widget