एक्स्प्लोर
वोडाफोनची ग्राहकांसाठी खास भेट, वोडाफोन प्लेचं फ्री सब्सक्रीप्शन

मुंबई: टेलिकॉम कंपनी वोडाफोन इंडियानं यावर्षी 31 डिसेंबरपर्यंत आपल्या सर्व यूजर्सना प्ले अॅपच्या फ्री सब्सक्रिप्शनची घोषणा केली आहे. या अॅपवर अनेक भाषेतील 14000 अधिक सिनेमे उपलब्ध आहेत. वोडाफोन प्ले एक खास अॅप आहे. ज्यामध्ये व्हिडिओ टेलिव्हिजन शो, सिनेमे, न्यूज चॅनल तुम्हाला पाहता येतात. वोडाफोन इंडियाचे संचालक संदीप कटारिया यांनी सांगितलं की, 'मोठ्या प्रमाणात लोकं स्मार्टफोनवर व्हिडिओ पाहणं पसंत करतात. अनेक अॅपपेक्षा त्यांना वोडाफोन अॅपमधून व्हिडिओ, गाणी डाऊनलोड करणं सोपं जातं.' वोडाफोन प्लेला तुम्ही स्मार्टफोन वरुन गुगल प्ले किंवा अॅपल अॅप स्टोअरमधून डाऊनलोड करु शकता.
आणखी वाचा























