एक्स्प्लोर
iPhone X सारखा कॅमेरा, VIVO चा नवा फोन लवकरच भारतात
वीवोच्या रिअर कॅमेराची डिजाईन आयफोन X सारखीच आहे. शाओमीने काही दिवसांपूर्वीच लाँच केलेल्या रेडमी नोट 5 प्रोच्या रिअर ड्युअल कॅमेरामध्येही अशीच डिजाईन दिली होती.
नवी दिल्ली : वीवो 27 मार्चला भारतात आपला नवा स्मार्टफोन V9 लाँच करणार आहे. लाँचिंगपूर्वीच या फोनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा असेल, असं फोटोंमध्ये दिसत आहे.
फोटोंमध्ये दिसतंय त्यानुसार, वीवोच्या रिअर कॅमेराची डिजाईन आयफोन X सारखीच आहे. शाओमीने काही दिवसांपूर्वीच लाँच केलेल्या रेडमी नोट 5 प्रोच्या रिअर ड्युअल कॅमेरामध्येही अशीच डिजाईन दिली होती. दरम्यान, फोनचं फिंगरप्रिंट सेन्सर बॅक साईटलाच ठेवण्यात आलं आहे.
या स्मार्टफोनची सर्वात मोठी विशेषता कॅमेरा हीच असण्याची शक्यता आहे. 24 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा असेल, असा दावा केला जातोय. तर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 660 प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. शिवाय या स्मार्टफोनची किंमत जवळपास 25 हजार रुपये असू शकते.
यापूर्वी वीवोने आपला स्मार्टफोन V7 मध्ये 5.7 इंच आकाराची स्क्रीन आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 प्रोसेसर देण्यात आलं होतं. स्मार्टफोनमध्ये 4GB रॅमसह 32GB इंटर्नल स्टोरेज होतं. भारतीय बाजारात V7 ची किंमत 16 हजार 990 रुपये ठेवण्यात आली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement