एक्स्प्लोर
VIVO ची आयपीएल स्पेशल एडिशन लाँच, किंमत आणि फीचर्स

मुंबई : VIVO ने आयपीएल स्पेशल एडिशन VIVO V5 प्लस हा स्मार्टफोन लाँच केला आहे. फ्लिपकार्टवर हा फोन विक्रीसाठी उपलब्ध असून 25 हजार 990 रुपये किंमत ठेवण्यात आली आहे. या फोनवर आयपीएलचा लोगो देण्यात आला आहे. 20 मेगापिक्सेलचा हायटेक फीचर्सचा ड्युअल फ्रंट कॅमेरा या फोनचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. तर 16 मेगापिक्सेलचा रियर कॅमेराही देण्यात आला आहे. व्हिव्हो V5 प्लस चे फीचर्स :
- 5.5 इंच आकाराची स्क्रिन
- 2.0 GHz ऑक्टाकोअर स्नॅपड्रॅगन 625 प्रोसेसर
- 4 GB रॅम, 64 GB इंटर्नल स्टोरेज
- 8 आणि 20 मेगापिक्सेल ड्युअल फ्रंट कॅमेरा, 16 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा
- 3160 mAh क्षमतेची बॅटरी
आणखी वाचा























