एक्स्प्लोर
‘ट्विटर अकाऊंटचा पासवर्ड तात्काळ बदला’, ट्विटरकडून आवाहन
तुम्ही जर ट्विटर वापरत असाल तर त्वरित तुमच्या ट्विटर अकाऊंटचा पासवर्ड बदला. कारण ट्विटर सोशल नेटवर्किंग वेबसाईटने सगळ्या यूजर्सना पासवर्ड बदलण्यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक जाहीर केलं आहे.
मुंबई : तुम्ही जर ट्विटर वापरत असाल तर त्वरित तुमच्या ट्विटर अकाऊंटचा पासवर्ड बदला. कारण ट्विटर सोशल नेटवर्किंग वेबसाईटने सगळ्या यूजर्सना पासवर्ड बदलण्यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक जाहीर केलं आहे.
स्टोअर्ड पासवर्डच्या इंटर्नल लॉगमध्ये बग आढळल्याने ट्विटरने यूजर्सना पासवर्ड बदलण्यासाठी सांगितलं आहे.
दरम्यान, आतपर्यंत एकाही ट्विटर अकाऊंटचा गैरवापर झाल्याची तक्रार ट्विटर वेबसाईटकडे आलेली नाही. मात्र, तरीही खबरदारीचा उपाय म्हणून यूजर्सनी ट्विटरचा स्टोअर्ड पासवर्ड बदलावा असं सांगण्यात आलं आहे.
ट्विटरने आपल्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरुन यासंबंधीचं ट्वीट केलं आहे.
मागील काही दिवसांपासून डेटा चोरीची प्रकरण समोर येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून ट्वीटरने आपल्या सर्व यूजर्सना पासवर्ड बदलण्यास सांगितलं आहे. ट्विटरनेही डेटा विकला, ‘द संडे टेलिग्राफ’चा दावा दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी ट्विटरने केंब्रिज अॅनालिटिकाला ट्विटरने डेटा विकल्याचं वृत्त ब्रिटनमधील वृत्तपत्र ‘द संडे टेलिग्राफ'ने दिलं होतं. कॅम्ब्रिज अनालिटिकाचा संस्थापक अलेक्जांद्र कोगनने 2015मध्ये ट्विटरकडून यूजर्स डेटा खरेदी केला होता. यासाठी त्याने ग्लोबल सायन्स रिसर्च नावाने एक फर्म तयार केली होती. द संडे टेलिग्राफने असाही दावा केला होता की, कोगनने अनेक यूजर्सचे ट्वीट, यूजरनेम, फोटो, प्रोफाईल फोटो, आणि लोकशन हा संपू्र्ण डेटा मिळवला होता. संबंधित बातम्या : फेसबुकपाठोपाठ ट्विटरनेही डेटा विकला, ‘द संडे टेलिग्राफ’चा दावाWe recently found a bug that stored passwords unmasked in an internal log. We fixed the bug and have no indication of a breach or misuse by anyone. As a precaution, consider changing your password on all services where you’ve used this password. https://t.co/RyEDvQOTaZ
— Twitter Support (@TwitterSupport) May 3, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
रायगड
Advertisement