एक्स्प्लोर
आता ट्विटरवर अपलोड करता येणार मोठ्या GIF फाईल्स
मुंबई : सोशल नेटवर्किंगमधील एक महत्वाचं नाव असलेल्या ट्विटरने आता टाईमलाईनवर जीआयएफ फाईल म्हणजेच ग्राफिक्स इंटरचेंज फॉर्मेट फाईल अपलोड करण्याची क्षमता 5 एमबीवरून 15 एमबी पर्यंत वाढवली आहे. मात्र सध्या ही सुविधा डेस्कटॉपवरूनच ट्विटरवर जीआयएफ फाईल अपलोड करणाऱ्यांसाठी आहे.
म्हणजेच तुम्ही मोबाईल अॅपमधून ट्विटर टाईमलाईनवर जीआयएफ फाईल अपलोड करणार असाल तर तुम्हाला 5 एमबीची मर्यादा कायम राहणार आहे. मोबाईल अॅपप्रमाणेच ट्वीटरच्याच ट्वीटडेक या डेस्कटॉप अॅपवरही पूर्वीचीच 5 एमबीची मर्यादा कायम ठेवण्यात आलीय.
https://twitter.com/twittermedia/status/752990152356728837
जीआयएफ या फॉर्मॅटच्या मदतीने अतिशय छोट्या कालावधीचे व्हिडीओ शेअर करता येतात. अलीकडे ट्विटरसह अनेक सोशल नेटवर्किंग साईट्सवर जीआयएफ फाईल्सचा अक्षरशः सुळसुळाट झाला आहे. अल्पावधीतच जीआयएफ हा फॉरमॅट लोकप्रिय झाला आहे. त्यामुळेच जास्त मोठ्या साईजच्या जीआयएफ फाईल्स अपलोड करायला ट्वीटरने सुरूवात केल्याचं मानलं जातंय.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement