एक्स्प्लोर
आता बिनधास्त ट्वीट करा, चुकलात तर दुरुस्त करा!
मुंबई : ट्विटर टाईमलाईनवर पोस्ट केलेला तुमचं ट्वीट आता तुम्हाला एडिट किंवा दुरुस्त करता येणार आहे. ट्विटरचे सीईओ जॅक दोरसे यांनीच ही माहिती दिली आहे.
आगामी म्हणजे परवापासून सुरु होणाऱ्या नव्या 2017 वर्षात ट्विटरवर यूजर्सना काय काय बदल अपेक्षित आहेत, हे जाणून घेण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सीईओ जॅक दोरसे यांनी ट्विटरवर भविष्यातील सुधारणांची माहिती दिली.
सोशल नेटवर्किंगमध्ये फक्त 140 कॅरेक्टर्सच्या जोरावर आपलं स्थान अढळ करणारं ट्विटर हे महत्त्वाचं माध्यम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ ट्विटरवर उपलब्ध आहे. अनेक सरकारी निर्णय आणि बातम्या यांचा मुख्य स्रोत हल्ली ट्विटर टाईमलाईन झाली आहे. ट्विटरवर अनेक सेलिब्रिटी तसंच राजकीय नेते स्वतः उपलब्ध असतात. ट्विटरच्या ट्रेण्ड्सने जगभरात अनेक बातमीपत्रांचा क्रमही निश्चित केला जातो.
फक्त 140 कॅरेक्टर ही ट्विटरची मर्यादा असली तरी अनेकांना ते ट्विटरचं बलस्थानही वाटतं. मात्र याच ट्विटरची आणखी सर्वात मोठी मर्यादा म्हणजे एकदा टाकलेली पोस्ट किंवा ट्विट हा एडिट किंवा दुरुस्त करता येत नाही. असे चुकीचे ट्वीट गेल्यामुळे अनेकांना मोठा मनस्ताप करावा लागला आहे. त्यावर पर्याय म्हणजे एकच, तो म्हणजे आपण टाकलेला ट्वीट पूर्णपणे डिलीट करणं. ट्विटराईट्स किंवा ट्विपल्सकडून गेल्या अनेक वर्षांपासून ट्विटर पोस्ट एडिटेबल असावी अशी मागणी होत होती.
सोशल नेटवर्किंगमध्ये दबदबा असलेलं सर्वात मोठं नाव म्हणजे फेसबुक. फेसबुकनेही आपल्या सर्व युजर्सना फेसबुक पोस्ट किंवा कॉमेंट एडिट करण्याची सोय उपलब्ध करुन दिली आहे. त्याच पावलावर पाऊल टाकत ट्विटरही एकदा टाकलेलं किंवा पोस्ट केलेलं ट्वीट एडिट करण्याची सोय उपलब्ध करुन देणार आहे.
<blockquote class="twitter-tweet" data-lang="en"><p lang="en" dir="ltr">Following in the footsteps of Brian Chesky: what's the most important thing you want to see Twitter improve or create in 2017? <a href="https://twitter.com/hashtag/Twitter2017?src=hash" rel='nofollow'>#Twitter2017</a></p>— jack (@jack) <a href="https://twitter.com/jack/status/814537990366228480" rel='nofollow'>December 29, 2016</a></blockquote>
<script async src="//platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"></script>
ट्विटरला टाईमलाईनवर 'एडिट'चा पर्याय असावा, ही युजर्सची खूप जुनी मागणी आहे, तिच या नव्या वर्षात पूर्ण होण्याची शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement